Phone Fell in Water : अनेकदा असं होतं की, आपला स्मार्टफोन (Smartphone) पाण्यात भिजतो. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेलच. कधी पावसाच्या पाण्यात, तर कधी चुकून फोनला पाणी लागतं आणि फोन (Mobile) भिजतो. जगभरातील अनेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या पद्धतींचा वापर करून तुमचा फोन खराब होण्यापासून वाचवू शकता. पाण्यात भिजलेला फोन सुकवण्यासाठी तांदूळ वापरणे ही एक सामान्य पद्धत आहे. पण फोन सुकवण्यासाठी तांदूळ वापरण्याची पद्धत खरंच योग्य आहे का? या संदर्भात कोणालाही माहीत नाही.  


आपल्यापैकी अनेकांनी तांदळाच्या डब्यात फोन ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. याचं कारण असं की, तांदळात ओलावा शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे ओले फोन सुकवण्यात तांदूळ फार उपयोगी आहे असं मानलं जातं.  


ओला फोन कसा स्वच्छ करायचा?


जर तुमचा फोन काही कारणास्तव ओला झाला असेल तर तो सुकवणं फार गरजेचं आहे. यासाठी सर्वात आधी फोन पाण्यात पडल्यानंतर तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा. त्यानंतर मोबाईलमधील सिमकार्ड काढून फोन पाण्याने स्वच्छ करावा. शक्य असल्यास, फोन बंद करा आणि फोनमधील बॅटरी बाहेर काढा.  


तांदळाने आयफोन कसा कोरडा होईल?


Apple च्या मते, आयफोन आपल्याला ओपन करता येत नाही. त्यामुळे जर तो पाण्यात भिजला तर त्याला हलक्या दाबाने हातावर मारा. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की, आयफोनचा कनेक्टर पोर्ट खालच्या दिशेने असावा, जेणेकरून जे काही पाणी किंवा द्रव असेल ते सहज बाहेर येऊ शकेल. पण, अॅपल कंपनी आयफोन जर बिघडला असेल तर तो तांदळाच्या डब्यात ठेवू नका असं सांगते. 


सॅमसंग फोन असल्यास काय करावं?


सॅमसंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर मोबाईल ओला झाला असेल तर तो सुकवण्यासाठी कापसाचा वापर करा. कारण फोनचा इअरफोन जॅक आणि चार्जिंग पोर्ट पूर्णपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसेच, आयफोनच्या ओपन पार्ट्समध्ये कापूस टाकू नका असं ॲपलचं म्हणणं आहे. पण, जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही फोन सुकवण्यासाठी तांदळाचा वापर करू शकता. पण, त्यासाठी तांदळाचे दाणे मोठे असावेत. तसेच, ते फोनच्या पोर्टमध्ये जाऊ नयेत याची काळजी घ्या. यामुळे फोन कोरडा होण्यास मदत होईल आणि पोर्ट देखील सुरक्षित राहतील.


तसेच, ॲपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, ओला फोन हवेशीर ठिकाणी ठेवावा. तर ओला फोन फक्त खोलीच्या तापमानात ठेवावा असं गुगलचं म्हणणं आहे. 


चुकूनही 'हे' काम करू नका


पाण्यात भिजलेल्या फोनवर हेअर ड्रायर किंवा कॉम्प्रेस्ड एअर कधीही वापरू नका. याशिवाय फ्रीजरमध्येही फोन ठेवू नका. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किटची समस्या उद्भवू शकते आणि तुमचा फोन कायमचा बंदही होऊ शकतो. याशिवाय, ओला फोन चालू करण्याचा प्रयत्न करू नका किंवा केबल चार्जरने चार्ज करू नका.


महत्त्वाच्या बातम्या :


वेटींग की रिग्रेट... रेल्वे तिकिटांची कटकट मिटणार; AI टूल तिकीट बुक करुन देणार; काय असेल प्रोसेस?