Oppo and OnePlus Smartphone : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI फीचर्सचा ट्रेंड फार वेगाने वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात एआय टेक्नॉलॉजीची (AI Technology) जोरदार चर्चा सुरू आहे. Samsung ने आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S24 Series चे तिन्ही स्मार्टफोन AI फीचर्ससह लॉन्च केले आहेत. कंपनीने याला Galaxy AI असं नाव दिलं आहे. सॅमसंगनंतर आता Oppo आणि OnePlus च्या कंपन्यांनाही आपले काही स्मार्टफोन्स AI फीचर्सने सुसज्ज करायचे आहेत. या दोन कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या AI फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तसेच, AI फीचर्स देण्यात येणाऱ्या स्मार्टफोन्सची नावं देखील जाणून घेणार आहोत.  


Oppo आणि OnePlus स्मार्टफोनमधील AI फिचर्स


खरंतर, Weibo या चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे, Oppo ने त्याच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये म्हणजेच Android 14 वर OS मध्ये AI फिचर्स देणार आहेत अशी घोषणा केली आहे. याचा अर्थ Oppo च्या सर्व स्मार्टफोन्समध्ये AI फीचर्स उपलब्ध असतील, ज्यात Android 14 वर सर्वात बेस्ट ColosOS अपडेट येत आहेत. OnePlus स्मार्टफोन चीनमध्ये ColosOS चा वापर करतात. पण, चीनबाहेरील जागतिक बाजारपेठेत OnePlus मधील सॉफ्टवेअरसाठी OxygenOS चा वापर केला जातो. 


यामुळेच चीनमधील ओप्पो तसेच वनप्लसच्या काही स्मार्टफोन्समध्ये एआय फीचर्स उपलब्ध होणार आहेत. कारण या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमच्या लेटेस्ट अपडेटद्वारे एआय फीचर्स दिले जातील. रिपोर्टनुसार, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 100 पेक्षा जास्त AI फीचर्स समाविष्ट करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये AI डिलीशन, AI कॉल समरी, Xiabou व्हॉईस असिस्टंट, AI ग्रीटिंग कार्ड आणि AI फोटो स्टुडिओ सारख्या अनेक फीचर्सचा समावेश असेल. आता अशा स्मार्टफोन्सची नावं जाणून घेऊयात ज्यामध्ये AI फीचर्स दिले जाणार आहेत. 


AI फिचर्स असलेले Oppo स्मार्टफोन


OPPO Find X7


OPPO Find X7 Ultra


OPPO Find X6


OPPO Find X6 Pro


OPPO Reno11


OPPO Reno11 Pro


OPPO Reno10


OPPO Reno10 Pro


OPPO Reno10 Pro+


OPPO शोधा N3


OPPO शोधा N3 फ्लिप


AI फिचर्स असलेले OnePlus स्मार्टफोन


वनप्लस 12


वनप्लस 11


OnePlus Ace 3


OnePlus Ace 2


OnePlus Ace 2 Pro 


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता