iQOO Smartphone : स्मार्टफोन निर्माता कंपनी IQOO लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचं नाव iQOO Z9 5G असं देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची मायक्रोसाईट लाईव्ह करण्यात आली आहे, ज्याद्वारे हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. नुकतीच या स्मार्टफोनच्या प्रोसेसर आणि कॅमेराबद्दलही माहिती समोर आली आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


iQOO ने त्याच्या आगामी स्मार्टफोन iQOO Z9 5G च्या चिपसेट माहितीची पुष्टी केली आहे. कंपनीच्या मते, या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Dimensity 7200 चिपसेट वापरला जाईल. AnTuTu V10 बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर 7,34,000 पॉइंट्स मिळवले आहेत असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.


फोन MediaTek चिपसेट सह येईल


याशिवाय iQoo चा हा आगामी स्मार्टफोन गीकबेंच डेटाबेसवर देखील स्पॉट करण्यात आला होता आणि या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेटचा तपशील देखील नमूद करण्यात आला होता. याशिवाय, गीकबेंच सूचीनुसार, हे देखील पुष्टी केली गेली आहे की हा स्मार्टफोन 8GB रॅम सह उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. 


कॅमेरा सेन्सरचा होणार वापर


iQOO Z9 5G च्या कॅमेरा फीचरबद्दल देखील काही माहिती समोर आली आहे. Iku च्या या स्मार्टफोनच्या प्रायमरी कॅमेरामध्ये Sony IMX882 सेन्सर वापरण्यात येणार आहे. कंपनीचा दावा आहे की, या स्मार्टफोनच्या किमतीच्या रेंजमध्ये Sony IMX882 सेन्सरसह येणारा हा पहिला स्मार्टफोन असेल. स्मार्टफोनचा कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह येऊ शकतो. याशिवाय, स्मार्टफोनच्या टीझरमध्ये असे दिसून येते की, स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो एलईडी फ्लॅशसह येईल. तसेच, असे दिसते की स्मार्टफोनचा कॅमेरा सेटअप चांगला असेल. याशिवाय, गीकबेंच सूचीनुसार, हे देखील पुष्टी केली गेली आहे की स्मार्टफोन 8GB रॅमसह येणार आहे आणि तो Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. 


iQOO Z9 5G Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. या स्मार्टफोनचा टीझर पाहता, हे माहित आहे की स्मार्टफोन टेक्सचर पॅटर्नसह ग्रीन शेडमध्ये येईल. आता कंपनी हा स्मार्टफोन कधी लॉन्च करते आणि त्याची किंमत काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता