Indus App Store : Fintech कंपनी PhonePe ने नुकताच भारतीय अॅप इंडस अॅप स्टोअर (Indus App Store) लॉन्च केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून मोबाईल यूजर्स 12 भारतीय भाषांमध्ये हे ॲप शोधू शकतील असं सांगण्यात येतंय. ॲप स्टोअरवर दिलेल्या माहितीनुसार, या अॅपमध्ये 4 लाख ॲप्स उपलब्ध आहेत. वॉलमार्टच्या मालकीचे फोनपेचे ॲप स्टोअर Google Play Store आणि इतर अॅप स्टोअरशी स्पर्धा करणार असं देखील सांगण्यात येत आहे. 


वैशिष्ट्ये काय आहेत?



  • हे ॲप स्टोअर भारतीय मोबाईल ग्राहकांना 45 रेंजमध्ये 2 लाखांहून अधिक मोबाईल ॲप्स आणि गेम डाऊनलोड करण्याची परवानगी देईल.

  • मोबाईल यूजर्स 12 भारतीय भाषांमध्ये हे ॲप शोधू शकतील, जे 95% भारतीयांच्या भाषेच्या जवळपास असेल. 

  • नवीन ॲप्सचा शोध ग्राहकांसाठी अधिक आकर्षक बनवण्यासाठी इंडस ॲप स्टोअर नवीन शॉर्ट-व्हिडीओ आधारित शोध सेवा देखील देण्यास सुरुवात केली आहे. 


यूजर्सना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही


इंडस ॲप स्टोअर हे खास भारतीय ॲप डेव्हलपर्सना लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. भारतीय ॲप डेव्हलपर या ॲप मार्केट प्लेसवर त्यांच्या ॲप्सची मोफत नोंदणी करू शकतील. यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. मात्र, ही ऑफर फक्त 1 वर्षासाठी असेल. याशिवाय या ॲप स्टोअरवर नोंदणी करणाऱ्या ॲप डेव्हलपर्सना पहिल्या वर्षी कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही. 






गुगल प्ले स्टोअरची मक्तेदारी संपणार?


सध्या, अनेक मोबाईल कंपन्या त्यांचे इन-बिल्ट ॲप स्टोअर प्रदान करतात. पण, बहुतेक यूजर्स फक्त Google Play Store वापरतात. दुसरी गोष्ट म्हणजे, मोबाईल कंपनीचे ॲप स्टोअर फक्त त्या कंपनीच्या मोबाईलसाठी असते. तर, PhonePe चे Indus App Store प्रत्येक Android फोन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. यामुळे गुगल प्ले स्टोअरशी हे अॅप स्पर्धा करणार आहे. 


13 महिन्यांसाठी कोणतेही लिस्टिंग शुल्क नाही


डेव्हलपर्सना प्रोत्साहन देण्यासाठी, Indus Appstore 1 एप्रिल 2025 पर्यंत एका वर्षासाठी कोणतेही ॲप सूची शुल्क आकारणार नाही. हे त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांच्या आवडीचे कोणतेही थर्ड पार्टी पेमेंट गेटवे वापरण्याची परवानगी देईल.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता