What Is UPI Lite X And Hello UPI? : आजकाल कॅशलेस व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांना अशा पद्धतीने पेमेंट करणे सोपे आणि सोयीस्कर वाटते. UPI पेमेंटमुळे वेळ तर वाचतोच पण याचा कोणताही धोका नसतो. अशातच UPI वापरकर्त्यांसाठी NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI वर आधारित दोन नवीन सेवा सुरू केल्या आहेत. UPI Lite X आणि दुसरा Hello UPI अशा या दोन सेवा असणार आहेत. NPCI ने UPI वापरकर्त्यांसाठी बिलपे कनेक्ट सुविधा देखील सुरू केली आहे. या सेवांविषयी सविस्तर जाणून घेऊयात.


UPI Lite X म्हणजे काय? 


UPI Lite X च्या मदतीने लोक आता इंटरनेट नसेल तरीही पेमेंट करू शकणार आहेत. पण याकरता एक अट आहे ती म्हणजे तुमच्या  फोनमध्ये निअर फील्ड कम्युनिकेशन असणं अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी इंटरनेटकनेक्टिव्हिटी नाही अशा ठिकाणी UPI Lite X चा मोठा फायदा होऊ शकतो.






Hello UPI म्हणजे काय?


Hello UPI च्या माध्यमातून वापरकर्ते व्हॉईस कमांडद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतील. यासाठी तुम्हाला फक्त ज्या कोणाला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे नाव घेऊन तुमचा पिन तिथे टाकायचा आहे. सध्या UPI ही सर्विस फक्त हिंदी आणि इंग्रजीत सुरू आहे. येत्या काळात NPCI त्यात आणखी भाषा अॅड करणार आहे. ज्यामुळे प्रत्येकजण त्याचा वापर करू शकतील. 






Bill-Pay Connect सर्विस म्हणजे काय?


Bill-Pay Connect संपूर्ण भारतात Bill Payment करता राष्ट्रीयीकृत क्रमांक आणते. बिल भरण्यासाठी वापरकर्त्यांना या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा लागेल. यानंतर त्यांना व्हेरिफिकेशन कॉल येईल. त्यावेळी ज्या कोणाला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीची पडताळणी केली जाईल. शिवाय Bill-Pay Connect मध्ये व्हॉइस असिस्टेड बिल पेमेंट सेवा देखील देण्यात येणार आहे. 


देशातील पहिले यूपीआय एटीएम काम कसे करेल?


यूपीआय एटीएमला टच पॅनल असणार आहे. तर यासाठी तुम्हाला यूपीआय कार्डलेस कॅश या पर्यायावर क्लिक करायचे आहे. हे केल्यास एक विंडो सुरू होईल. त्यात पैशाचे विविध पर्याय तुम्हाला दिसतील. तुम्हाला जितके पैसे काढायचे त्यावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रिनवर  क्यूआर कोड येईल. आता त्यानंतर यूपीआय अॅपवरु क्यूआर कोड स्कॅन करा... त्यानंतर युजर्सला बँक खाते निवडावे लागेल. त्यानंतर UPI पिन टाका. तुम्ही निवडलेली रक्कम यूपीआय एटीएममधून बाहेर येईल.


ही बातमी वाचा: 


WhatsApp Upcoming Feature : आता कामाच्या फाईल्स लगेच मिळणार; Whatsapp चं डॉक्युमेंट शेअरिंग फीचर लवकरच उपलब्ध