WhatsApp Upcoming Feature : लोकप्रिय मॅसेजिंग शेअरिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येतं. आतादेखील Meta ने व्हॉट्सअॅपचे एक नवीन फिचर लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. WhatsApp मध्ये डॉक्युमेंट शेअरिंग अधिक सोपी करण्यासाठी, कंपनी तुम्हाला एक नवीन 'डॉक्युमेंट पीकर टूल' देणार आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही थेट तुमच्या मोबाईलच्या गॅलरीतून फोटो किंवा व्हिडीओ डॉक्युमेंट म्हणून पाठवू शकता. सध्याच्या सुविधेमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर डॉक्युमेंट फाईल शेअर करता तेव्हा तुम्हाला रिसेंट डॉक्युमेंटचा किंवा ब्राऊज डॉक्युमेंटचा पर्याय मिळतो. अशा परिस्थितीत कामाची फाईल शोधण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण, नवीन मीडिया पीकर टूलच्या मदतीने तुम्ही गॅलरीमध्ये सहजपणे स्विच करू शकता आणि डॉक्युमेंट म्हणून कोणताही फोटो, व्हिडीओ इत्यादी शेअर करू शकता. याचा फायदा असा आहे की, डॉक्युमेंट शेअर करताना त्याच्या मदतीने लोक दुसर्‍या व्यक्तीला मूळ दर्जाच्या प्रतिमा किंवा व्हिडीओ पाठवू शकतात.


या अपडेटची माहिती Wabetainfo या वेबसाईटने शेअर केली आहे. सध्या हे अपडेट अँड्रॉईड बीटा 2.23.19.3 मध्ये अॅक्टिव्ह आहे. लवकरच, कंपनी सर्वांसाठी हे फीचर  रोलआउट करू शकते. तुम्हालाही व्हॉट्सअॅपचे सर्व अपडेट्स मिळवायचे असेल तर तुम्ही कंपनीच्या बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करू शकता.


काही काळापूर्वी कंपनीने अॅपमध्ये एचडी व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्याचा पर्याय दिला आहे. त्याच्या मदतीने तुम्ही 720p मध्ये फोटो किंवा व्हिडीओ पाठवू शकता. तसेच, तरीही फोटो किंवा व्हिडीओ त्याच्या ओरिजनल क्वालिटीमध्ये ट्रान्सफर होत नाही. तुम्हाला कोणतीही फाईल ओरिजनल क्वालिटीमध्ये पाठवायची असेल, तर तुम्ही ती डॉक्युमेंट म्हणून पाठवू शकता.


तुम्ही WhatsApp वर HD व्हिडीओ कसे शेअर करू शकता 



  • सर्वात आधी तुम्ही WhatsApp चं नवीन व्हर्जन अपडेट करा. 

  • आता तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp ओपन करा. 

  • यानंतर तुम्हाला ज्या चॅटमध्ये एचडी व्हिडीओ शेअर करायचा आहे त्यावर जा.

  • आता अटॅचमेंट आयकॉनवर टॅप करा आणि गॅलरीमध्ये जा.

  • आता तुम्हाला पाठवायचा असलेला व्हिडीओ शोधा आणि  Preview Option टॅप करा.

  • स्क्रीनच्या वरच्या भागात असलेले HD चिन्ह शोधा, स्टिकर, मेसेज शोधा.

  • HD पर्याय निवडा आणि मोठ्या फाईल आकाराची नोंद घ्या, नंतर "Done" बटणावर टॅप करून पुढे जा.

  • एकदा तुम्ही व्हिडीओमध्ये कोणतेही बदल किंवा सेव्ह केल्यानंतर, खालच्या उजव्या बाजूला असलेल्या पाठवा बटणावर टॅप करा.


'ही' वैशिष्ट्ये लवकरच उपलब्ध होतील 


WhatsApp अॅपमध्ये ईमेल लिंक, एकापेक्षा जास्त अकाऊंट लॉग इन, रिसेंट हिस्ट्री शेअर, टेक्स्ट फॉरमॅट इत्यादीसह अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडणार आहे. याशिवाय, कंपनी बर्याच काळापासून यूजरनेम फीचरवर काम करत आहे जी लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. युजरनेम फीचर इंस्टाग्राम आणि ट्विटरप्रमाणेच काम करेल. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Google Chrome Update : Google Chrome ला या महिन्यात 15 वर्ष पूर्ण होणार; नवीन अपडेटसह दिसतील 'हे' बदल