UPI Payment : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहे. सिंगापूर आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये UPI सुरू केल्यानंतर आता ते लवकरच न्यूझीलंडमध्येही पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात माहिती देताना वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, UPI चा वापर दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विचार केला जात आहे. मंगळवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि निर्यात विकास मंत्री डॅमियन ओ'कॉनर यांच्यात बैठक झाली. यादरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये UPI संदर्भात चर्चा झाली.
यूपीआयबाबत चर्चा सुरू
वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे की, UPI च्या वापराबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि पेमेंट्स न्यूझीलंड यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. दोन्ही बाजूंनी याचे स्वागत केले असून यापुढेही विचार सुरू ठेवण्याचे मान्य करण्यात आहे. न्यूझीलंडमध्ये UPI सुरू झाल्यास दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल यावर सहमती झाली आहे.
या देशांमध्ये UPI सेवा सुरू झाली
विशेष म्हणजे परदेशात भारतीय UPI ची मागणी झपाट्याने वाढत आहे. या वर्षी सिंगापूरच्या पेनाऊशी करार केल्यानंतर तेथे यूपीआय सुरू करण्यात आले आहे. सिंगापूर व्यतिरिक्त यूपीआयने फ्रान्समध्येही एंट्री केली आहे. यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार झाला आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवरपासून याची सुरुवात होईल. याशिवाय संयुक्त अरब अमिराती (UAE), भूतान आणि नेपाळ यांनी आधीच UPI करारावर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय एनपीसीआय अनेक युरोपीय देशांमध्ये घेऊन जाण्यासाठी बोलत आहे.
व्यवसाय वाढविण्याबाबत चर्चा
UPI व्यतिरिक्त दोन्ही देशांमधील व्यापार वाढविण्याबाबतही चर्चा झाली आहे. यामध्ये किवी हे फळ, औषधी, वाहतूक आणि तंत्रज्ञान यांचा व्यवसाय वाढविण्यावर चर्चा झाली. भारतातून न्यूझीलंडला 2021-22 या वर्षात $487.6 कोटी निर्यात होती. जी पुढील वर्षी $548 दशलक्ष झाली आहे. आयातीबद्दल बोलायचे तर 2021-22 मध्ये ती 375 कोटी डॉलर्स होती, जी पुढच्या वर्षी 478 कोटी डॉलर्स झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
AI for Earning : क्रिप्टोमध्ये गमावली आयुष्यभराची कमाई; पण AI च्या माध्यमातून कमावले कोट्यवधी रुपये