Paytm Fastag Recharge Dealine : तुम्ही पेटीएम (Paytm) वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या वाहनावर पेटीएमचा फास्टॅग (FASTag) इन्स्टॉल केला असेल, तर आता तो फास्टॅग निष्क्रिय केला जाऊ शकतो. कारण पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) घातलेल्या निर्बंधांमुळे, पेटीएम फास्टॅग ग्राहक 15 मार्चनंतर म्हणजेच उद्यापासून त्यांचा फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाहीत. NHAI ने पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना टोल प्लाझावर कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी 15 मार्चपूर्वी इतर कोणत्याही बँकेतून फास्टॅग खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. NHAI ने म्हटले आहे की, असे न केल्यास, राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना वापरकर्त्यांना दंड किंवा दुप्पट शुल्क भरावे लागू शकते. 


पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयची कारवाई


पेटीएम पेमेंट बँकांवरील निर्बंधांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने, पेटीएम फास्टॅग वापरकर्ते 15 मार्चनंतर रिचार्ज किंवा शिल्लक टॉप-अप करू शकणार नाहीत. तसेच, ग्राहक टोल भरण्यासाठी त्यांची विद्यमान शिल्लक वापरू शकतात. 


तुम्ही तुमचा फास्टॅग या 39 बँकांमध्ये शिफ्ट करू शकता


1. एअरटेल पेमेंट्स बँक
2. अलाहाबाद बँक
3. एयू स्मॉल फायनान्स बँक
4. ॲक्सिस बँक लि
5. बंधन बँक
6. बँक ऑफ बडोदा
7. बँक ऑफ महाराष्ट्र
8. कॅनरा बँक
9. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
10. सिटी युनियन बँक लि
11. कॉसमॉस बँक
12. Dombivli Nagari Sahakari Bank
13. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
14. फेडरल बँक
15. फिनो पेमेंट बँक
16. एचडीएफसी बँक
17. आयसीआयसीआय बँक
18. IDBI बँक
19. आयडीएफसी फर्स्ट बँक
20. इंडियन बँक
21. इंडियन ओव्हरसीज बँक
22. इंडसइंड बँक
23. J&K बँक
24. कर्नाटक बँक
25. Karur Vysya Bank
26. कोटक महिंद्रा बँक
27. लिव्हक्विक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
28. नागपूर नागरी सहकारी बँक लि
29. पंजाब महाराष्ट्र बँक
30. पंजाब नॅशनल बँक
31. Saraswat Bank
32. दक्षिण भारतीय बँक
33. स्टेट बँक ऑफ इंडिया
34. सिंडिकेट बँक
35. द जळगाव पीपल्स को-ऑप. बँक
36. त्रिशूर जिल्हा सहकारी बँक
37. युको बँक
38. युनियन बँक ऑफ इंडिया
39. येस बँक


Paytm FAStag कसे बंद कराल?


जर तुमच्याकडे पेटीएम फास्टॅग असेल पण तुम्ही पेटीएम ॲप वापरत नसाल तर आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ॲप डाऊनलोड करावे लागेल. पुढील प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकता. 



  • पेटीएम ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुमच्या पेटीएम खात्यात लॉग इन करा. तुमच्याकडे आधीपासून अकाऊंट नसल्यास, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून लगेच अकाऊंट तयार करू शकता.

  • त्यानंतर तिथे सर्च बॉक्समध्ये फास्टॅग सर्च करा. यानंतर मॅनेज फास्टॅगच्या पर्यायावर क्लिक करा.

  • ‘Help & Support’ वर क्लिक करा.

  • यामध्ये "Banking Services & Payment" सेक्शनमध्ये जाऊन "FASTag" वर क्लिक करून "Chat with us" ऑप्शन सिलेक्ट करा. 

  • त्यानंतर ‘FASTag प्रोफाईल अपडेट करण्याशी संबंधित प्रश्न’ या ऑप्शनवर क्लिक करा.

  • शेवटी "I Want to Close my FASTag" हा पर्याय निवडा. त्यानंतर स्क्रीनवरील सूचना फॉलो करा. तुमचा FASTag बंद केला जाईल. 


महत्त्वाच्या बातम्या :


फोन पाण्यात भिजला तर तांदळात सुकवायचा का? फायदा होईल की तोटा? जाणून घ्या