Save Internet Tips : आजकाल निम्म्याहून अधिक (Save Internet Tips) कामे ऑनलाइन सुरू झाली आहेत. मग तो अभ्यास असो, ऑनलाइन परीक्षा असो किंवा पेपर. ऑनलाइन पेमेंटपासून ते शॉपिंगपर्यंत सर्व काही इंटरनेटवर अवलंबून झाले आहे. अशावेळी स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. अनेकदा तुमच्या फोनचा डेटा लवकर संपायला लागतो. त्यामुळे तुमच्यासोबत अशा समस्या येऊ नयेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमचे इंटरनेट इतक्या लवकर कशामुळे बंद होते. इतकंच नाही तर तुम्ही ही समस्या कशी सोडवू शकता.


इंटरनेट लवकर का संपतं? (Save Internet Tips)




-तसं इंटरनेट लवकर बंद होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण त्यातील काही कारणे अशी आहेत जी जर तुम्ही   दुरुस्त केली तर या समस्येपासून सुटका होईल.
-इंटरनेट लवकर बंद होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे  सॉफ्टवेअरचे ऑटो-अपडेट ऑप्शन सुरु असणे.
-फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये नेव्हिगेशन अॅप्स, शॉपिंग अॅप्स, गेमिंग अॅप्स किंवा बॅकग्राऊंडमध्ये चालणाऱ्या इतर कोणत्याही प्रकारच्या अॅप्ससह अनेक अॅप्स सतत अॅक्टिव्ह असतात.
-यात फोनचे इंटरनेट गरजेशिवाय चालविणे किंवा सतत फोटो आणि व्हिडिओसाठी फोनचा कॅमेरा वापरणे यांचा समावेश आहे.


डेटा सेव्ह करण्यासाठी करा 'या' सेटिंग्ज



-जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डेटा सेव्ह करायचा असेल तर तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा सेव्हर मोड इनेबल करा.
-यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, फक्त फोनच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर कनेक्शनवर क्लिक करा, डेटा वापरावर क्लिक करा आणि डेट सेव्हरच्या पर्यायावर क्लिक करा.
-या प्रक्रियेनंतर बॅकग्राऊंडमध्ये कोणते अॅप्स डेटा वापरू शकतात हे सिलेक्ट करु शकता.


डेटा लिमीट सेट करा



-डेटा लिमिट सेट करण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कनेक्शनवर क्लिक करा.
-त्यानंतर डेटा वापराच्या पर्यायावर क्लिक करा.
-यानंतर सेट डेटा वॉर्निंग इनेबल करा.
-हे केल्यानंतर डेटा वॉर्निंगवर जा आणि तुमची दैनंदिन इंटरनेट वापराची मर्यादा सेट करा.
-तुमची निर्धारित डेटा वापराची मर्यादा गाठली की तुमच्या फोनमध्ये इंटरनेट काम करणे बंद करेल. 
फोनमध्ये ऑटो अपडेटचा पर्याय बंद ठेवा. 
-गरज भासल्यास कोणतेही अॅप किंवा सॉफ्टवेअर मॅन्युअली अपडेट करा. 
-यासाठी तुम्ही वेळोवेळी अपडेट्स तपासू शकता.


इतर महत्वाची बातमी-


Apple Gadgets : Apple Device वर भन्नाट ख्रिसमस ऑफर्स; स्वस्तात मिळतोय Apple MacBook Air, MacBook Pro, iphone 15!