Apple Gadgets : अॅपल आपल्या डिव्हाइस आणि महाग (Apple Device) म्हणून ओळखली जाते. तुम्हीही नवीन लॅपटॉप शोधत असाल तर ही योग्य वेळ ठरू शकते. Apple MacBook Air, MacBook Pro, Mac Mini आणि iMac ऑर्डर करण्यापूर्वी या ऑफरबद्दल नक्की जाणून घ्या. हे डिव्हाइस कंपनीने 2020 मध्ये लाँच केले होते. पण एवढ्या स्वस्तात खरेदी करण्यासाठी तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही लावाव्या लागतात.


Imagineवर ख्रिसमस सेल सुरू झाला आहे. HDFC Bank Card  वर 5 हजार रुपयांचा  Instant Discount मिळत आहे. त्याचबरोबर 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. अनेक मॉडेल्सवर तुम्हाला या ऑफर्स मिळत आहेत. विशेष म्हणजे ही ऑफर मॅकबुक, मॅक मिनीवरही उपलब्ध आहे. Apple M1 MacBook Air (256GB) केवळ  46,918 रुपयांत खरेदी करता येईल. म्हणजेच हा लॅपटॉप तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतो.


तर MacBook Air ची MRP 99,900 रुपये आहे. यात 17,982 रुपयांच्याInstant Discountचाही समावेश आहे. HDFC Card वर 5 हजार रुपयांचा Instant Cashback देखील उपलब्ध आहे. तर  Exchange Offer अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसदेखील मिळू शकतो. पण Cashify कडून ही माहिती दिली जात आहे. Apple 14 Inch MacBook Pro आणि16 Inch MacBook Pro (M2 Chips) वर ही वेगळी सूट मिळू शकते.


iPhoneवर ही तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्ही iPhone 15 Pro  खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 4 हजार रुपयांची सूट मिळू शकते. पण यासाठी तुम्हाला HDFC Bank Credit Cardद्वारे पैसे द्यावे लागतील. त्यानंतर 128 जीबी व्हेरियंटसाठी तुम्हाला  1,30,900  रुपये मोजावे लागतील. या फोनची खूप चर्चा आहे. नुकतेच लाँच केले. हीच आता योग्य वेळ ठरू शकते.


कॅमेरा आणि डिस्प्लेबाबत माहिती


आयफोन 15 सीरिजमध्ये 48 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, 24 मेगा पिक्सेल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 12 मेगापिक्सेल फ्रंटकॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 15 मध्ये 6.1 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. त्याशिवास आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाची डिस्पे देण्यात आला आहे. आयफोन 15 सीरिजमध्ये A16 बायोनिक चिप फिचर्स फार महत्त्वाचं आहे. यामध्ये नवीन कॅमेरा सिस्टीम देण्यात आलेली आहे. यातील नाईट मोडमध्ये नवीन अपडेट देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, नवीन आयफोन 15 प्रो मध्ये यूजर्स 4K 60FPS एवढ्या हाय क्वालिटीचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार आहेत.


इतर महत्वाची बातमी-


Offline Google Map Save : सुट्यांमध्ये फिरायला जाताय? नेटवर्क नसल्याने रस्ता चुकू शकता, आताच या स्टेप्स वापरुन Offline Google Map सेव्ह करा!