Anant Ambani Watch : सध्या सोशल मीडियावर (Social Media) उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिक मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची धूमधाम पाहायला मिळतेय इन्स्टाग्राम उघडताच अंबानी परिवाराच्या या ग्रॅंड सोहळ्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, यातलाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अनंत अंबानी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांना घड्याळ दाखवताना दिसतायत. हे घड्याळ पाहिल्यानंतर झुकरबर्ग यांच्या पत्नीला चांगलाच धक्काच बसताना दिसतोय. हे घड्याळ पाहिल्यानंतर या घड्याळाची खासियत नेमकी काय आहे? तसेच, किंमत किती असेल? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


झुकरबर्ग यांच्या पत्नीला धक्काच बसला


व्हायरल व्हिडीओमध्ये अनंत अंबानी झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला यांना वनताराला भेट देण्यास सांगतात. याच दरम्यान प्रिसिला यांचं लक्ष अनंत अंबानींच्या घड्याळाकडे जातं. त्या घड्याळाची प्रशंसा करतात आणि म्हणतात. 'ते घड्याळ फार सुंदर आहे.' खूप छान आहे. त्यानंतर त्या अनंत यांना हे घड्याळ कोणी डिझाईन केलं याबद्दल विचारतात..यानंतर झुकरबर्ग मध्येच म्हणतात की, त्यांना कधीच शौक नव्हता. पण, अनंत अंबानींचं घड्याळ पाहिल्यानंतर त्यांचंही मत बदललं. त्यानंतर त्यांची काही वेळ या विषयावर चर्चा सुरु होती. 


किंमत किती आहे?


या दरम्यान प्रिसिला चॅन यांनी अनंत अंबानी यांना हे घड्याळ कोणी डिझाईन केलं असा प्रश्न विचारला असता, अनंत अंबानी यांनी सांगितले की हे रिचर्ड मिल कंपनीचे घड्याळ आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घड्याळाची किंमत सुमारे 14 कोटी रुपये आहे. एका अहवालानुसार, रिचर्ड मिलचे सर्वात महागडे घड्याळ RM 56-02 Tourbillon Sapphire आहे. त्याची किंमत जवळपास 16.5 कोटी रुपये आहे.


प्री-वेडिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला 


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा 3 मार्च रोजी पार पडला. या सोहळ्यात देशातील आणि जगातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या प्री-वेडिंग सोहळ्याला मार्क झुकरबर्ग, बिल गेट्ससारखे दिग्गज मंडळीही आले होते. मुकेश आणि राधिकाचे लग्न जुलैमध्ये होणार आहे.


पाहा व्हिडीओ :



महत्त्वाच्या बातम्या :


Chakshu Online Portal : आता ऑनलाईन घोटाळ्यांना बसणार आळा; भारत सरकारकडून 'चक्षु' पोर्टल लॉन्च