Chakshu Online Portal : इंटरनेट (Internet) आणि सोशल मीडियाच्या (Social Media) या काळात यूजर्सना जितके फायदे आहेत तितकेच त्याचे नुकसानही झालं आहे. इंटरनेटद्वारे लोकांची अनेक कामे सुरळीत आणि सोपी तर होतात. पण, यामुळे सायबर गुन्हेगारीचं देखील प्रमाण वाढत चाललं आहे. हीच बाब लक्षात घेऊन भारत सरकारने सायबर क्राईम (Cyber Crime) आणि गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरु केलं आहे. या पोर्टलचं नाव "चक्षु" (Chakshu Online Portal) असं ठेवण्यात आलं आहे. या प्लॅटफॉर्मवर, भारतातील सर्व नागरिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकतात. सरकारच्या या नवीन पोर्टलबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. 


ऑनलाईन घोटाळे थांबवण्याचा उद्देश


सरकारच्या या नवीन उपक्रमाचा उद्देश सोशल मीडियावर पसरवले जाणारे खोटे आणि फसवे संदेश रोखणे हा आहे. भारत सरकारच्या चक्षू या नवीन ऑनलाईन पोर्टलद्वारे भारतातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीबाबत किंवा फसवणुकीसाठी आलेले संदेश किंवा कॉल याबाबत थेट सरकारकडे तक्रार करू शकणार आहे. सरकार सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे तसेच, फसवणूक करणाऱ्यांवर पुरेशी कारवाई देखील करणार आहे. जेणेकरून देशात ऑनलाईन माध्यमातून होणारे घोटाळे कमी करता येतील.


चक्षु काय आहे?


चक्षु प्लॅटफॉर्मसह, भारतीय नागरिकांना सायबर गुन्हे, पैशांशी संबंधित फसवणूक, कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेले संदेश याची तक्रार करण्याची सुविधा मिळते. संशयास्पद फसव्या काही उदाहरणांमध्ये बँक खाते, पेमेंट वॉलेट, सिम, गॅस कनेक्शन, वीज कनेक्शन, केवायसी अपडेट, एक्सपायरी, निष्क्रिय करणे, सेक्सटोर्शन यांचा समावेश आहे.


कोणत्या गोष्टींची तक्रार करू शकता?


भारत सरकारचे हे पोर्टल, Chakshu, दूरसंचार विभाग (DoT) द्वारे संचालित अधिकृत संचार साथी वेबसाईटवर उपलब्ध आहे. व्हॉट्सॲप, एसएमएस आणि कॉल्सवरील बनावट संदेशांमुळे होणारी सायबर फसवणूक लक्षात घेऊन हे पोर्टल तयार करण्यात आलं आहे. Chakshu पोर्टलद्वारे, लोक आर्थिक घोटाळे, बनावट ग्राहक समर्थन, बनावट सरकारी अधिकारी, बनावट नोकऱ्या आणि कर्ज ऑफर अशी तोतयागिरी करणारे कॉल संदेश पाठवणारे लोक सर्व प्रकारच्या घोटाळ्यांना सामोरे जात आहेत. तुम्ही संशयास्पद कॉल, संदेश किंवा संभाषणाची तक्रार करू शकता.


सरकार काय कारवाई करणार?


चक्षु पोर्टलवर फसवणुकीची तक्रार आल्यास पोलीस, बँका आणि इतर तपास यंत्रणा सक्रिय होतील. तक्रार केल्यानंतर काही तासांत कारवाईही सुरू होईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि फसवणुकीशी संबंधित क्रमांक त्वरित ब्लॉक केला जाईल.


महत्त्वाच्या बातम्या :


5000mAh बॅटरी आणि 45W चार्जिंगसह Nothing Phone 2(a) भारतात लॉन्च; स्पेशल सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर