6G Network Device : जपान (Japan) तंत्रज्ञानाच्या (Technology) बाबतीत इतर देशांपेक्षा अनेक पाऊलं पुढे आहे. जपानने जगातील पहिले 6G उपकरण तयार केलं आहे. या जगातील पहिल्या  6G डिव्हाईसचा वेग 5G पेक्षा 500 पटीने अधिक आहे. यामुळे तुम्ही एका सेकंदात 5 चित्रपट डाउनलोड करु शकता, इतका याचा स्पीड आहे.


जगातील पहिलं 6G डिव्हाईस


एकीकडे जगात अद्याप 5G ही अनेक भागांमध्ये योग्यरित्या पोहोचला नाहीय, भारतात तर अद्यापही अशी काही ठिकाणे आहे, जिथे साधा नेटवर्कही नाही. पण जपानने 6G ची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. जपानने जगातील पहिले 6G डिव्हाईस प्रोटोटाईप सादर केलं आहे. एका जपानी कन्सोर्टियम कंपनीने अलीकडेच जगातील पहिलं हाय-स्पीड 6G प्रोटोटाइप उपकरण सादर केलं आहे. 


जपानने बनवलं पहिलं 6G नेटवर्क प्रोटोटाईप


मिळालेल्या माहितीनुसार, जपानने तयार केलेले हे उपकरण काही कंपनीने भागीदारी अंतर्गत बनवलं आहे. यामध्ये डोकोमो, एनटीटी कॉर्पोरेशन, एनईसी कॉर्पोरेशन आणि फुजीत्सू यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या 6G नेटवर्क चाचणी एकाच उपकरणावर केली गेली आहे. 6G नेटवर्कची व्यावसायिक चाचणी अद्याप झालेली नाही. आता याचा एक प्रोटोटाईप म्हणजे मॉडेल बनवण्यात आला असून त्यांची पुढील चाचणी सुरु आहे. 6G नेटवर्कमुळे भविष्यात वापरकर्त्यांना अतिशय वेगवान इंटरनेट स्पीड मिळणार आहे.


5G फोन स्पीडपेक्षा 500 पट जास्त वेग


या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, या 6G डिव्हाईच्या साहाय्याने तुम्ही 100 गीगाबिट्स प्रति सेकंद (Gbps) वेगाने 330 फुटांपेक्षा जास्त अंतरापर्यंत डेटा पाठवू शकते. हा वेग सध्याच्या 5G प्रोसेसरपेक्षा 20 पट जास्त आहे. 6G डिव्हाईसचा एकूण वेग सरासरी 5G फोन स्पीडपेक्षा 500 पट जास्त आहे. या वेगवाने डेटा शेअरिंगचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे.


6G मुळे या गोष्टींचा फायदा


4G वरून जग 5G कडे पोहोचलं आहे. 5G मुळे  व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि मोबाईल ब्राउझिंग यासाठी डेटा क्षमता वाढवण्यावर जग लक्ष केंद्रित करत असताना, जपानने 6G नेटवर्कसाठी प्रयत्न सुरु केला आहे. 6G च्या वेगासह, रिअल-टाइम होलोग्राफिक कम्युनिकेश आणि इमर्सिव्ह व्हर्च्युअल आणि एआय अनुभव यासारख्या गोष्टी सक्षम होण्यास फायदा होईल.


6G नेटवर्कसाठी काय आवश्यक असेल?


6G नेटवर्क स्पीडचा आनंद घेण्यासाठी अद्याप अनेक गोष्टी करणं बाकी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूलभूत पायाभूत सुविधा. हे तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात येण्याआधी, या नवीन 6G तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारे सेल टॉवर आणि 6G अँटेना असलेले नवीन फोन देखील बाजारात उपलब्ध होणे आवश्यक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?