मुंबई : बँक अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी आपण सर्रास एटीएम कार्डचा वापर करतो. एटीएममधून पैसे काढताना पैसे काढताना मशीममधू पैसे मोजण्याचा आवाज येतो तो सर्वांना ऐकलाच असेल. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, एटीएम मशीनमधून पैसे काढताना येणार आवाज पैसे मोजण्याचा नसतो, मग हा आवाज नेमका कसला असतो, ते जाणून घ्या.


ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही


एटीएम मशीनमधून पैसे काढताना तुम्ही आवाज ऐकला असेल. आपल्यापैकी बहुतेकांना हा आवाज पैशांचा म्हणजेच नोटा मोजल्याचा आवाज आहे, असंच वाटत असेल. पण, असं मूळीच नाही. एटीएममधून येणारा हा आवाज पैसे मोजतानाचा आवाज नाही. यामागचं सत्य काय हे या बातमीत जाणून घ्या.


ATM मधून येणारा आवाज नेमका कसला?


एटीएम मशीनमध्ये तुम्ही कार्ड स्वाईप केल्यानंतर पिनकोड टाकून पैसे काढता. यावेळी एटीएम मशीनमधून मशीनद्वारे पैसे मोजताना जसा आवाज येतो, तशा प्रकारचा आवाज ऐकू येतो, त्यामुळेच आपल्यापैकी बहुतेकांचा असा समज आहे की, एटीएममधून येणारा आवाज हा नोटा मोजण्याचा आहे, पण असं अजिबात नाही.


एटीएममधून आवाज आला की अनेकांना असं वाटतं की, मशीन पैसे मोजत आहे, पण हे खरं नाही. एटीएम मशीनमधून पैसे काढताना येणारा आवाज पैसे किंवा नोटा मोजण्याचा आवाज नसून एटीएमधील मोटर आणि मशीन काम करताना होणारा आवाज आहे. महत्वाचं म्हणजे यासाठी एटीएममध्ये कोणताही स्पीकर लावला जात नाही, तर एटीएमची रचना करताना ते कृत्रिमरीत्या आवाज काढू शकेल अशा पद्धतीने डिझाइन केलेले असते.


ATM चा शोध कोणी लावला?


एटीएमचा शोध स्कॉटिश नागरिक जॉन शेफर्ड बॅरॉन यांनी लावला आहे. 1965 मध्ये एक दिवस बॅरन पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचले पण त्यावेळी बॅरनला एक मिनिट उशीर झाला त्यामुळे बँक बंद झाली. यानंतर जॉन शेफर्ड बॅरनने असं मशीन बनवण्याचा विचार केला ज्यातून 24 तास पैसे काढता येतील. यानंतर जॉन शेफर्ड यांनी दोन वर्षे अथक परिश्रम करून एका मशीनचा शोध लावला, यालाच आपण एटीएम म्हणतो. बार्कलेज बँक ऑफ लंडनमध्ये 27 जून 1967 रोजी जगातील पहिलं एटीएम बसवण्यात आलं. या एटीएममधून पैसे काढणारा पहिला व्यक्ती कॉमेडी अभिनेता रेग वार्नी होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


तुम्हीही ATM कार्ड वापरताना ही चूक करताय? पडेल महागात