Aadhaar update : आधार कार्ड आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. प्रत्येक कामाकरता आजकाल आधार कार्ड महत्त्वाचे मानले जाते. कोणत्याही योजनेचा भाग बनवण्याकरता आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र आजकाल याच आधार कार्डच्या नावाखाली लोकांना मोठ्या प्रमाणात फसवले जात आहे. आपलं आधार कार्ड हे वेळोवेळी अपडेट करुन घेण्याच्या सूचना केंद्र सरकार देत असतं. आता याबाबत एक गंभीर इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.


तुम्हाला तुमच्या ई-मेलवर किंवा Whatsapp वर जर आधार कार्डविषयी काहीही मेसेज आलेला असेल तर वेळीच सावधान व्हा. UIDAI ने लोकांना अशा संदेशांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ते कधीही लोकांना त्यांची ओळख किंवा पत्ता पुरावा ई-मेलवर शेअर करण्यास सांगत नाही, असे म्हटले आहे. UIDAI ने लोकांना त्यांचे आधार कार्ड ऑनलाईन किंवा त्यांच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. 


काय आहे UIDAI चा इशारा?


UIDAI ने पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे ज्याद्वारे त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. UIDAI ने पोस्टद्वारे सांगितले की, Aadhaar ई-मेल किंवा WhatsApp वर अपडेट करण्यासाठी तुमचे POI/POA कागदपत्रे शेअर करण्यास कधीच सांगत नाही. त्यामुळे असा काही मेसेज आला तर त्या मेसेजकडे दुर्लक्ष करा. अशा मेसेजवर विश्वास ठेऊन तुम्ही जर तुमची महत्त्वाची कागदपत्र शेअर केली तर त्या कागदांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आधार अपडेट करण्यासाठी केवळ अधिकृत मार्गांचाच वापर करा, असंही सांगण्यात आलं आहे.






असे अपडेट करा तुमचे आधारकार्ड (Update your Aadhaar card like this)


तुम्ही आधार कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अपडेट (Aadhaar Online Update) करु शकता. तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसंच, नजीकच्या आधार केंद्रावर जाऊनही तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आधार अपडेट करुन घेऊ शकता.


इतर महत्वाच्या बातम्या


Twitter : ट्विटरवरुन ब्लाॅक फीचर लवकरच काढले जाणार, एलॉन मस्कने पोस्ट शेअर करत दिली माहिती