Iphone 15 Series Price Leaked : आताच्या तरुण पिढीमध्ये आयफोनचे (Iphone) यूजर्स अधिक आहेत जे आयफोनच्या नव्या सीरिजची सातत्याने प्रतिक्षा करत असल्याचं पाहायला मिळतं.  त्यामुळे अॅपलकडून सतत्याने अॅपलच्या सीरिजमध्ये अपडेट करण्यात येतात. अशातच अमेरिकन स्मार्टफोन कंपनी Apple या वर्षी आपली iPhone 15 सीरीज लॉन्च करू शकते. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश असू शकतो. यापैकी  iPhone 15 Pro आणि Pro Max ची किंमत iPhone 14 Pro पेक्षा महाग असू शकते. Apple या वर्षी सप्टेंबर महिन्यात जागतिक स्तरावर iPhone 15 सिरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे. लॉन्चच्या आधी आगामी मॉडेल्सची किंमत ऑनलाईन समोर आली आहे. आयफोन 15 सिरीजमध्ये iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Plus आणि iPhone 15 Pro Max चा समावेश असण्याची शक्यता आहे.


आयफोन 15 प्रो ची किंमत आयफोन 14 प्रो पेक्षा 10,000 रूपयांनी जास्त असू शकते, तर तर iPhone 15 Pro Max ची किंमत 15,000 रूपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 प्रो 1,29,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. तर आयफोन 14 प्रो मॅक्स 1,39,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.


आयफोन 15 सिरीजमधील मॉडेलची अपेक्षित किंमत


आयफोन 15  (अंदाजे 65,700 रुपये) या किंमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर आयफोन 15 प्लसची सुरुवातीची किंमत  (अंदाजे 73,900), आयफोन 15 प्रो ची किंमत (अंदाजे 90,100) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि iPhone 15 Pro Max ची किंमत (अंदाजे 1,06,500 रुपये ) असण्याची शक्यता आहे.


आयफोन 15 मध्ये फास्ट चार्जिंग फिचर मिळणार?


मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन15 मॉडेल 20W या चार्जिंग स्पीडसह येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर आयफोन 15 प्रो मध्ये  27W पर्यंत चार्जिंग स्पीड मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु Android फोनच्या तुलनेत आयफोनच्या चार्जिंगचा हा स्पीड कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण तरीही आयफोन 15 प्रो हा कमी वेळात वेगवान चार्ज होण्याची शक्यता आहे.  परंतु ही सीरिज लॉंच होईपर्यंत कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अॅपल त्यांच्या येणाऱ्या सर्व सीरिजमध्ये फास्ट चार्जिंगचे फिचर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Redmi 12 5G Launch : Redmi 12 5G 1 ऑगस्ट रोजी भारतात होणार लाँच , जाणून घ्या भन्नाट फिचर्सबद्दल