Redmi 12 5G Launch : स्मार्टफोन ब्रँड Xiaomi, 1 ऑगस्टला ग्राहकांकरता धमाका करणार आहे. कंपनीने माहिती दिली आहे की कंपनी येत्या 1 ऑगस्ट रोजी Redmi 12 5G फोन लॉन्च करेल. कंपनीने अधिकृत वेबसाइटवर आपल्या आगामी फोनची झलक देखील कंपनीने शेअर केली आहे. लॉन्च होण्यापूर्वी, Redmi 12 5G च्या स्टोरेज मॉडेल्सची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे मूनस्टोन सिल्व्हर कलर ऑप्शन, क्रिस्टल ग्लास डिस्प्ले आणि 50MP कॅमेरासह लॉन्च केले जाईल. तसेच, 8GB RAM, 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज असेल. या फोनची  किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया,


Redmi 12 5G स्टोरेज आणि किंमत


Redmi 12 5G दोन मॉडेलमध्ये लाँच केला जाऊ शकतो. पहिला 6GB RAM, 128GB स्टोरेज, दुसरा 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आणि 8GB रॅम मॉडेलची किंमत 13,999 रुपये असू शकते. 


Redmi 12 5G चे स्पेसिफिकेशन 


 Xiaomi च्या वेबसाइटवर कंपनीने फोनशी संबंधित काही स्पेसिफिकेशन्सची माहिती शेअर केली आहे. Redmi 12 5G मध्ये एलईडी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच, यात फिल्म फिल्टरसह 50MP फ्रंट कॅमेरा असू शकतो


redmi 12 5G डिझाइन 


वेबसाइटवर दिलेल्या फोनच्या इमेजनुसार, Redmi 12 5G फोनमध्ये क्रिस्टल ग्लास डिझाइन आहे. ज्यामध्ये इंद्रधनुष्याची झलक आहे. त्याच वेळी, ते 5,000mAh बॅटरी आणि सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउटसह येईल. 


Redmi 12 5G ची संभाव्य वैशिष्ट्ये


Redmi 12 5G ला 6.79-इंच FHD + डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आणि 1080 X 2400 पिक्सेल रिझोल्यूशन मिळू शकते. हे MediaTek Helio G88 12nm प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जे Mali-G52 2EEMC2 GPU सह जोडले जाईल. 


Redmi 12 5G प्रोसेसर


Redmi 12 5G Android 13 वर आधारित MIUI 14 वर चालेल. फोनची ऑपरेटिंग सिस्टीम जी वापरकर्त्यांना भन्नाट अनुभव देऊ शकते.


Redmi 12 5G मध्ये विशेष काय आहे?


फोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा 50MP, अल्ट्रा-वाइड 8MP आणि मॅक्रो सेन्सर 2MP उपलब्ध आहेत. त्याच वेळी, समोर 8MP कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपलब्ध आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Amazon Sale : Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल लवकरच होणार सुरू मिळणार बंपर ऑफर