मुंबई : भारतीय आंतराळ संशोधन संस्था अर्था इस्रो (IRSO) च्या बहुप्रतीक्षिक मिशन चांद्रयान -3 (ISRO Chandrayan 3) इतिहास रचण्यापासून काही पावलं दूर आहे. चांद्रयान 3 चा (Chandrayan 3) लॅण्डर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी पूर्णत: तयार आहे. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लॅण्डर सेफ लॅण्डिंग करेल. या लॅण्डिंगच्या दोन दिवस आधी लॅण्डरने चंद्राचे काही फोटो पाठवले आहेत.


चांद्रयान-3 ने लॅण्डिंगच्या आधी लॅण्डर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्याचा (LHDAC) वापर करुन हे फोटो काढले आहेत. हे फोटो चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावरील आहेत, जिथे चंद्रयान-3 च्या लॅण्डर विक्रमची लॅण्डिंग होणार आहे.


इस्रोने शेअर केले फोटो


इस्रोने हे सर्व फोटो सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म 'एक्स'वर (पूर्वी ट्विटर) शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना इस्रोने लिहिलं आहे की, चंद्राच्या दूरच्या भागातील हे फोटो आहेत,जे लॅण्डर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्यातून (LHDAC) काढले आहेत. हा कॅमेरा लॅण्डर खाली उतरताना सुरक्षित पृष्ठभाग (खोल खड्डे) असलेलं क्षेत्र शोधण्यास मदत करतो. हा कॅमेरा इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये विकसित करण्यात आला आहे.






दक्षिण ध्रुवावर उतरणार चांद्रयान-3


चांद्रयान - 3 लॅण्डर दोन दिवसांनी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 वाजता  (भारतीय वेळेनुसार) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची अपेक्षा आहे. रविवारी म्हणजेच काल सकाळी मोहिमेचा दुसरा आणि अंतिम डीबूस्टिंग ऑपरेशन (वेग कमी करण्याची प्रक्रिया) यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.


चंद्रावर यशस्वी लॅण्डिंग केल्यानंतर भारत अशी कामगिरी करणार चौथाच देश ठरेल. आतापर्यंत केवळ अमेरिका, सोवियत संघ आणि चीन यांचीच चांद्रमोहीम यशस्वी झाली आहे.


संपूर्ण देश 'सॉफ्ट लॅण्डिंग'चा साक्षीदार होणार


संपूर्ण देशाला चांद्रयान 3 च्या यशस्वी सॉफ्ट लॅण्डिंग प्रतीक्षा आहे.सॉफ्ट लॅण्डिंग यशस्वी अशी प्रार्थना सर्व भारतीय मनोमन करत आहेत. या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार भारतीयांना होता येणार आहे. याचं थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजून 27 वाजता सुरु होईल. सॉफ्ट लॅण्डिंगचं थेट प्रक्षेपण इस्रोची वेबसाईट, यूट्यूब चॅनल, इस्रोचं फेसबुक पेज आणि डीडी नॅशनल टीव्हीसह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.


हेही वाचा


ISRO Chandrayan 3 : चांद्रयान 3 चंद्राच्या जवळ पोहचला, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडिंग होण्याची शक्यता