IND vs AUS Final : संपूर्ण देशाच्या नजरा आज वर्ल्ड कप मॅचकडे (IND vs AUS Final) लागल्या आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात हा सामना रंगत आहे. अनेकजण (India vs Australia World Cup Final 2023) विविध ठिकाणी हा सामना बघत आहे. याचं लाईव्ह स्ट्रिमिंग अनेक OTT प्लॅटफार्मवर सुरु आहे.  ओटीटी अॅपवर हा अंतिम सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत 5 करोड 5 लाख युजर्स लाइव्ह कनेक्ट झाले. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला लाइव्ह युजर्सची संख्या 5 करोड 1 लाखांच्या पुढे गेली होती. तर रोहित शर्माने या सामन्यातील पहिला षटकार मारला. दहाव्या ओव्हरच्या पहिलेच यंदाच्या सामन्याने व्हिवर्सचा रेकॉर्ड मोडला आहे. 


त्यानंतर लगेचच रोहितने चौकार ठोकला होता. 22 मिनिटांत शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली आला. रोहित शर्माच्या कॅच आऊटनंतर लगेचच प्रेक्षकांची संख्या साडेपाच कोटींवर पोहोचली होती.  यापूर्वी ओटीटीवर 44 लाख लाइव्ह युजर्सचा रेकॉर्ड होता, पण मॅचमध्ये हा विक्रम मोडला गेला आहे. याआधी 14 ऑक्टोबररोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातील लाइव्ह प्रेक्षकांची संख्या 35 लाखांवर पोहोचली होती. याआधी दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामन्यात 5.3 मिलियन युजर्स लाइव्ह झाले होते. भारतातील घरोघरी ही मॅच बघितली जात आहे. सगळ्यांना भारत जिंकण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना केली जात आहे. 


वर्ल्डकप फायनलमध्ये अर्धशतक


आयसीसी वर्ल्डकप  2023 च्या फायनल मॅचमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) झुंजार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह  विराट कोहलीने आणखी विक्रम  आपल्या नावावर नोंदवला आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्या (Cricket World Cup 2023) उपांत्य (Semi Final) आणि अंतिम (CWC Final) सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटचा कोहलीचा समावेश झाला आहे. विराट कोहली अशी कामगिरी करणारा जगातील सातवा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी 1979 साली इंग्लंडचा मायकेल ब्रेअरली, 1987 साली ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून, 1992 साली पाकिस्तानचा जावेद मियांदाद, 1996 साली श्रीलंकेचा अरविंद डी सिल्वा, 2015 साली न्यूझीलंडचा ग्रँट इलियट, 2015 साली ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंनी उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली. यावेळी 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.


इतर महत्वाची बातमी-


India vs Australia World Cup Final 2023 : टीम इंडियाला 'इंग्रजांना' आठवून वर्ल्डकप जिंकावा लागणार; 229 धावा करूनही याच वर्ल्डकपमध्ये विजय खेचला होता!