World Cup Final 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस मोठा आहे. अवघ्या काही तासांनंतर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम (World Cup Final 2023) सामना रंगत आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक बडे सेलिब्रिटी येत असून आयसीसीने सामन्यासाठी खास व्यवस्था केली आहे. आयसीसीने सामन्यादरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवले आहेत. जर तुम्हाला हा मोठा सामना आपल्या लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही किंवा टॅबवर पाहायचा असेल तर तुम्हाला खाली सांगितलेली ट्रिक फॉलो करावी लागेल. 


स्मार्ट टीव्हीमध्ये पाहण्यासाठी फॉलो करा या ट्रिक्स


स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्ही विश्वचषकाचा अंतिम सामना दोन प्रकारे पाहू शकता. डिस्ने+हॉटस्टारवर मॅच एन्जॉय करायची असेल तर त्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. टीव्हीवर मॅच पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 299 रुपयांचे प्रीमियम रिचार्ज करावे लागेल, ज्यामध्ये तुम्ही चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर 4k व्हिडिओ क्वालिटीमध्ये मॅच पाहू शकाल. जर तुम्हाला तुमच्या स्मार्ट टीव्हीवर या सामन्याचा मोफत आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क अंतर्गत तुम्ही स्टार गोल्ड एसडी, स्टार स्पोर्ट पाहू शकता.


हा सामना तुम्ही मोबाईलवर फ्री पाहू शकाल...


जर तुम्ही स्मार्टफोनवरून मॅच पाहण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून डिस्ने+हॉटस्टारचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही आणि तुम्ही या मॅचचा मोफत आनंद घेऊ शकता.


आजची मॅच भारतासाठी स्पेशल आहे. त्यासाठी भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. सगळ्यांनाच भारताला विजयी झालेलं पाहायचं आहे. भारतातील मोठ्या शहरातच नाही तर ग्रामीण भाागातदेखील क्रिकेटचा उत्साह पाहायला मिळत आहे. गावागावातदेखील मोठमोठ्या स्क्रिन्स लावून क्रिकेटची मॅच पाहिली जाणार आहे. 


VIPs पाहणार महामुकाबला...


गृहमंत्री अमित शाहदेखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहायला येणार आहेत.ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्ससुद्धा उपस्थित राहणार आहेत. सचिन तेंडुलकरदेखील हजेरी लावणार आहे. कपिल देवदेखील येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते रजनीकांतदेखील उपस्थित असणार आहेत. टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील उपस्थित असेल. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील सामना पाहायला येणार आहेत. शाहरुख खान, आमिर खान आणि रणवीर सिंहदेखील हजेरी लावणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफदेखील सामना पाहायला उपस्थित असतील.


इतर महत्वाची बातमी-


IND vs AUS Final 2023 : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, पाहा प्लेईंग 11