Delete large E-mails : गुगल अकाऊंटसोबत कंपनी (Delete large E-mails) तुम्हाला 15 GB फ्री क्लाऊड स्टोरेज देते. यात तुमचा ड्राइव्ह डेटा, फोटो, जीमेल अटॅचमेंट, व्हॉट्सअॅप बॅकअप (Whatsapp Backup) अशा सर्व गोष्टी स्टोअर केल्या जातात. कारण यात सर्व डेटा (Free Gmail Storage) साठवला जातो. त्यामुळे आपल्या जीमेलमध्ये फार स्पेस उरत नाही. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेलदेखील लोड होत नाही. ही स्पेस रिकामी करण्यासाठी आपण अनेक फाईल्स डिलीट करतो मात्र त्यामुळेदेखील हवा तेवढा स्पेस मिळत नाही.आपल्याला मेलमध्ये जास्त MB च्या फाईल्सदेखील येत राहतात. त्यामुळे आज आम्ही सांगणार आहोत की तुमच्या इमेलमधील मोठ्या फाईल्स कशा ओळखायच्या आणि त्यानंतर त्या डिलीट कशा करायच्या. 


हेवी फाईल्स कशा डिलीट कराव्यात?


-Gmail वर हेवी फाईल्स शोधण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील जीमेल अॅप ओपन करावं लागेल
- त्यानंतर सर्च बारमध्ये जावं लागेल.
- येथे आपल्याला आकार टाइप करावा लागेल. उदा. 5 एमबी किंवा आपल्याला किती एमबी फाईल पहायची आहे. 
- त्यानंतर एंटर दाबताच तुम्हाला जीमेलवर फाईल्स दिसतील
- इथून तुम्ही सर्व मेल सिलेक्ट करून डिलीट करू शकता. यामुळे तुमची बरीच स्टोरेज मोकळी होईल. 
-बिनाकामाचे मेल डिलीट केल्यानंतर आपण ट्रॅश फोल्डर देखील रिकामे करू शकता. 
-डिलीट करण्यात आलेले ट्रॅशमध्ये जमा होतात.
- 30 दिवसांनंतर हे मेल आपोआप डिलीट होतात.
- तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते डिलीटही करू शकता. 


मोबाइल अॅपमध्ये नवं फिचर


गुगलने काही दिवसांपूर्वी जीमेल युजर्ससाठी मोबाइल अॅपवर सिलेक्ट ऑल ऑल हा पर्याय दिला  आहे. याच्या मदतीने तुम्ही एकावेळी 50 मेल सिलेक्ट आणि डिलीट करू शकता. यापूर्वी युजर्स एका वेळी एकच मेल डिलीट करू शकत होते. याशिवाय कंपनीने युजर्सना मेल ट्रान्सलेशनसह इतर फीचर्सही दिले आहेत. या फिचर मुळे मेल डिलीट करणं सोपं झालं आहे. त्यामुळे आता तुम्ही थेट 50 मेल सिलेक्ट करुन डिलीट करु शकणार आहात. दरवेळी आपण मोबाईल स्टोरेज फुल्ल झालं म्हणून तक्रार करत असतो. नव्या फिचरमुळे आणि नव्या ट्रिकमुळे आता स्टोरेजची चिंता कमी होणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


iPhone 16 feature leaks : iPhone 16चे फिचर्स leaks?, iPhone 16 कसा दिसेल? कधी होणार लॉंच? डिस्प्लेपासून बॅटरी लाइफपर्यंत, संपूर्ण माहिती एका क्लिकवर...