Sam Altman Returns in OpenAI :  OpenAI सह-संस्थापक सॅम ऑल्टमन (Sam Altman) अखेर OpenAI मध्ये परतले आहेत. कंपनीने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले की, सॅम अल्टमॅन हे सीईओ म्हणून पुन्हा परतत आहेत. ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी सॅमर्स आणि अॅडम डीट एंजेलो यांच्यासह ते पु्न्हा रूजू होतील. त्याबाबत करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 






OpenAI च्या 500 कर्मचाऱ्यांनी दिली धमकी 


खरं तर, ओपनएआयच्या 500 हून अधिक कर्मचार्‍यांनी कंपनीला धमकी दिली होती की जर कंपनीच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला नाही तर ते सर्व राजीनामा देतील. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी एका पत्रात म्हटले होते की ते सर्वजण त्यांचे माजी बॉस सॅम ऑल्टमन यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टच्या नवीन विभागात सामील होतील. असे मानले जाते की या धमकीमुळे ओपनएआयला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि सॅम ऑल्टमनला परत बोलावावे लागले.


मस्क यांनी साधला निशाणा


एलन मस्क यांनी या संपूर्ण प्रकरणाला प्रसिद्धीसाठीचा स्टंट म्हटले आहे.  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी या प्रकरणाला केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हटले आहे. मस्कने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले. 






काय आहे प्रकरण?


17 नोव्हेंबर रोजी, ओपन एआयच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी कंपनीचे एआय सह-संस्थापक सॅम ऑल्टमन यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केले. दुसऱ्याच दिवशी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी माहिती दिली की सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार आहेत. वेगाने बदलत असलेल्या घडामोडींमध्ये, कंपनीचे कर्मचारी नवीन सीईओंच्या विरोधात एकत्र आले. सॅम ऑल्टमनच्या पुनरागमनासाठी मोर्चेबांधणी करत असल्याच्या बातम्या सतत येत होत्या. ओपनएआयमध्ये तीन दिवसांत तीन सीईओंच्या नियुक्तीचीही चर्चा होती आणि सॅम कंपनीत परतणार असल्याची सतत चर्चा होती.