Nokia Smartphones : 90 च्या दशकातील लोकांचा पहिला फोन (Nokia) कोणता विचारल्यास थेट नाव ऐकू येईल ते म्हणजे 'Nokia'. कितीही वेळा पडला, कितीही वेळा बॅटरी आणि स्क्रिन वेगळी झाली तर सगळं एकत्र जोडलं की फोन सुरु व्हायचा. मोबाईलच्या अनेक कंपन्या नसल्याने आणि चांगल्या प्रतिचे फोन असल्याने प्रत्येकाच्या हाती फक्त नोकिया फोन दिसायचा. 'Trusted Brand' म्हणून एकेकाळी नोकियाच्या मोबाईलची ओळख होती. मात्र याच नोकिया मोबाईल कंपनीवर आता वाईट दिवस आले आहेत. नोकिया मोबाईल बनवणारी कंपनी HMD Global आता आपले मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. 


आता नोकियाला हटवून कंपनी आपले ब्रँडिंग स्मार्टफोन आणणार आहे. कंपनीने स्वत: ट्विटरवर याची घोषणा केली आहे. कंपनीने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ते लवकरच आपले ब्रँडिंग स्मार्टफोन आणणार आहेत. म्हणजेच यानंतर युजर्सला HMD Smartphone वर नोकिया दिसणार नाही आहे.  


फोनबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन Mobile World Congress (MWC 2024)  मध्ये लाँच केला जाऊ शकतो. इतकंच नाही तर एचएमडीने आणखी ही अनेक बदल केले आहेत. कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरही अनेक बदल केले जात आहेत. उदाहरणार्थ, कंपनीचे ट्विटर अकाऊंट Nokia.com ऐवजी HMD.com दिसेल.


नोकियाचे स्मार्टफोन बंद होणार?


मात्र, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण एचएमडीने आतापर्यंत नोकियाचे स्मार्टफोनही बनवत राहणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या 7 वर्षांपासून कंपनी नोकिया ब्रँडिंग स्मार्टफोन बनवत आहे. 2016 मध्ये एचएमडीने मायक्रोसॉफ्टकडून नोकिया विकत घेतला. यानंतर कंपनीने अनेक प्रयोग केले असले तरी त्याचा परिणाम नोकियाच्या मार्केट शेअरवर दिसून आला नाही. आता या निर्णयामुळे नोकिया युजर्सना मोठा धक्का बसणार आहे. 


नोकियाचं काय होणार?


यापूर्वी विंडोज ओएसवर काम करणारे नोकियाचे स्मार्टफोन मायक्रोसॉफ्ट विकत होते.नोकिया लुमिया सीरिज ही मायक्रोसॉफ्टची लोकप्रिय स्मार्टफोन सीरिज होती, पण नंतर मायक्रोसॉफ्टने नोकिया ब्रँडचे हक्क एचएमडी ग्लोबलला विकले. तेव्हापासून एचएमडी नोकियासाठी स्मार्टफोन बनवत होती. आता एचएमडीने स्पष्टपणे सांगितले आहे की, नोकियाचे स्मार्टफोन तयार होत राहतील. मात्र HMD कंपनीला आपली ओळख वाढवायची आहे. आपल्या कंपनीला नवी ओळख द्यायची आहे. त्यामुळे या कंपनीने आपल्या नावाने स्मार्टफोन लाँच करायचं ठरवलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Samsung Galaxy S24 : Samsung Galaxy S24 सीरिजचा सेल सुरू, हजारो रुपयांची होणार बचत, Bank Offers कोणते आहेत?