Google Pay Security Tips : आजकाल आॅनलाईनचा जमाना आहे. सगळ्या गोष्टी सध्या कॅशलेस पद्धतीने केल्या जातात. कॅशलेस पेमेंटमुळे मोठे-मोठे व्यवहार देखील आता एका झटक्यात केले जातात. Google Pay हे सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. पण आता Google Pay वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
तुम्ही रोज वापरत असलेले Google Pay फेस आयडी, पासवर्ड आणि पिन अशा सिक्युरिटी फिचरला सपोर्ट करते. यामुळे इतर कोणाच्या हातात जरी तुमचा फोन गेला तरी तो व्यक्ती तुमचे Google Pay वापरू शकणार नाही. तुमच्या फोनला स्क्रिन लाॅक केलेले असेल तर फोनच्या आतील अॅप पर्यंत अनोळखी व्यक्ती पोहोचू शकणार नाही.
Google Pay च्या मदतीने जेव्हा तुम्ही कोणाला पैसे पाठवता त्यावेळी ते तुम्हाला फसवणुकीबद्दल अलर्ट नोटीफिकेशन पाठवले जाते. ज्या कोणाला तुम्ही पैसे पाठवत आहात त्यांचा नंबर तुमच्या Contact List मध्ये नसेल तर Google Pay तुम्हाला अलर्ट नोटीफिकेशन पाठवते. मशिन लर्निंग च्या मदतीने Google Pay हे काम करते.
GooglePay द्वारे सर्व पेमेंट डेटा Google खात्यात सेव्ह केला जातो. तुमचा सर्व पेमेंट डेटा Google वर सुरक्षित राहतो आणि Google पेमेंटच्या वेळी हा डेटा एन्क्रिप्ट करते, जेणेकरून तुमचे पेमेंट पूर्णपणे सुरक्षित असेल.
आॅनलाईन पेमेंट करण्याकरता कार्ड पेमेंटपेक्षा Google Pay जास्त सुरक्षित मानले जाते. तुमचे व्हर्च्युअल खाते या अॅपवर वापरले जाते, जेणेकरून कोणीही तुमच्या खात्याची माहिती घेऊ शकत नाही किंवा तुमचे कार्ड कोणाला माहीत नाही.
पिन न टाकता Google Pay वर पेमेंट केले जाणार
Google Pay च्या म्हणण्यानुसार UPI Lite आता प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कंपनी डिजिटल पेमेंट सोपे, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. UPI Lite Google Pay वर आणले गेले आहे. यामुळे यूजर्सना UPI पिन न टाकता जलद आणि एक-क्लिक UPI व्यवहार करू शकतात. Lite खाते यूजर्सच्या बँक खात्याशी जोडले जाईल. परंतु, रिअल टाईममध्ये बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून नसणार आहे.
UPI Lite च्या मदतीने, यूजर्स पीक ट्रान्झॅक्शन वेळेतही सहज पेमेंट करू शकतात. यूजर्स दिवसातून दोनदा 2,000 रुपये लोड करू शकतात आणि एका वेळी 200 रुपयांचा व्यवहार करू शकतात. सध्या भारतात 15 बँका UPI Lite पेमेंटला सपोर्ट करतात.
इतर महत्वाच्या बातम्या