Kid’s Smartwatch 2023 : मुलांसाठी स्मार्टवाॅच घेण्याचा विचार करत आहात? 'हे' आहेत लहान मुलांसाठी खास स्मार्टवॉच

स्मार्टवॉच बजेट आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आता मुलांच्या गरजा लक्षात घेऊन स्मार्टवॉच लाँच करण्यात आली आहेत.

Continues below advertisement

Kid’s Smartwatch : आजच्या काळात स्मार्टवाॅचचे वेड मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच स्मार्टवाॅच आवडते. लहान मुलांसाठी सध्या बाजारात स्मार्टवाॅचचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्वस्तात मस्त असे विविध प्रकारचे आकर्षक स्मार्टवाॅच तुम्ही तुमच्या मुलांना विकत घेऊन देऊ शकता. स्मार्टवॉच बजेट आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये बाजारात उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आता मुलांच्या गरजा लक्षात घेऊन स्मार्टवॉच लाँच करण्यात आली आहेत.

Continues below advertisement

Apple Watch SE 

ऍपल वॉच एसई स्मार्टवॉचमध्ये पॅरेंट कंट्रोल फीचर देण्यात आले आहे, हे घड्याळ आयफोनसोबत Connect केले जाऊ शकते. ज्यामुळे तुम्ही त्यासोबत व्हॉइस कॉल करू शकता. जर तुम्हाला Apple Watch SE वॉच घ्यायचे असेल तर तुम्ही ते फक्त 29,600 रुपयांना खरेदी करू शकता.

Fitbit Ace 3 

Fitbit Ace 3 स्मार्टवॉचमध्ये फिटनेस ट्रॅकर देण्यात आला आहे. यासोबतच या घड्याळात 8 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी देण्यात आली आहे. हे घड्याळ तुम्ही 12,000 रुपयांना खरेदी करू शकता. Fitbit Ace 3 वॉचमध्ये स्लीप ट्रॅकिंग, आरोग्याच्या रोजच्या सवयींमध्ये होणारा बदल लगेच समजू शकतो.

Noise Scout 

Noise Scout स्मार्टवॉचची किंमत 5,999 रुपये आहे. या स्मार्टवॉचमध्ये एक सिम स्लॉट आहे जो 4G LTE कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. तुम्ही Noise Scout स्मार्टवॉचद्वारे व्हिडिओ कॉलिंग आणि ऑडिओ कॉल देखील करू शकता. याशिवाय या घड्याळात SOS बटण देखील देण्यात आले आहे जे पालकांना मुले कोणत्या ठिकाणी आहेत हे सांगेल.

Sekyo S1 

Sekyo S1 हे परवडणारे स्मार्टवॉच आहे. या घड्याळात GPS बिल्ट आहे आणि ते 2G नेटवर्कसह येते. ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करू शकता. तसेच, हे स्मार्टवॉच 90 मीटरच्या आजूबाजूचे रिअल टाइम ट्रॅकिंग करते. तुम्ही हे घड्याळ केवळ 2,476 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Watchout Smartwatch 

वॉचआऊट स्मार्टवॉचवरून व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल केले जाऊ शकतात. ज्यासाठी या स्मार्टवॉचमध्ये 4जी एलटीई नेटवर्क देण्यात आले आहे. या स्मार्टवॉचच्या डिस्प्लेमध्ये 2MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. जर मुलांनी हे घड्याळ काढले तर, शेवटच्या ठिकाणी मुलगा कुठे होता याचे अलर्ट नोटीफिकेशन पालकांना पाठविले जाते. हे घड्याळ तुम्ही 9,174 रुपयांना खरेदी करू शकता.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! नवख्यांसाठी कॉम्प्युटर टायपिंगचा 'श्रीगणेशा' करणारे अॅप 30 वर्षानंतर बंद होणार

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola