UPI Lite Limit increased : लोकांनी UPI Lite चा मोठ्या प्रमाणात वापर करावा यासाठी RBI ने काल (10 ऑगस्ट) एक मोठं पाऊल उचललं आहे. RBI ने UPI Lite मर्यादा 200 रुपयांवरून 500 रुपये केली आहे. म्हणजेच आता तुम्ही PIN न टाकता UPI Lite द्वारे एकावेळी 500 रुपये पेमेंट करू शकता. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी UPI Lite ची मर्यादा वाढविण्यात आली आहे. जेणेकरून प्रत्येकजण त्याचा वापर करू शकेल. 


UPI Lite म्हणजे काय?


UPI Lite ही UPI पेमेंटचं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. हे 2022 मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI द्वारे सादर करण्यात आले होते. लहान व्यवहार जलद आणि सुलभ व्हावेत हा या अॅपमागचा मोठा उद्देश आहे. UPI Lite द्वारे, तुम्ही आजपासून तुमचा पिन न टाकता 500 रूपयांचं पेमेंट एकाच वेळी करू शकता. इतकंच नाही, तर तुम्ही तुमच्या UPI Lite वॉलेटमध्ये एका दिवसात एकूण 4000 रुपये जोडू शकता.   


UPI Lite वापरायचं कसं?



  • UPI Lite वापरण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही पेमेंट अॅपवर जायचं आहे. Phone pay, Google pay आणि Paytm यापैकी एखादं अॅप तुम्ही सुरु करा.

  • त्यानंतर तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन UPI ​​Lite चा पर्याय शोधावा लागेल.

  • आता तुम्हाला तुमची बँक निवडून आणि तुमचं अकाऊंट Activate करायचं आहे.

  • तुमचं अकाऊंट अॅक्टिव्हेट झाल्यावर, पुढच्या वेळी पेमेंट करताना UPI Lite चा पर्याय निवडायचा आहे. आणि त्याद्वारे पैसे भरायचे आहेत.


यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, सध्या फक्त काही बँका UPI Lite ची सेवा देतात. तुमचं बँक अकाऊंट त्या निवडक बँकांमध्ये असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.


पेमेंट मर्यादा वाढवण्याव्यतिरिक्त, RBI लवकरच UPI ची सुविधा आणि पोहोच वाढवण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये जोडणार आहे. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे UPI Lite द्वारे नियर-फील्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञानाचा वापर करून ऑफलाईन पेमेंट करणे. हे वैशिष्ट्य लोकांना मर्यादित किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या परिस्थितीतही डिजिटल पेमेंट करण्यास सक्षम करेल. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Sanchar Saathi Portal : मोबाईल चोरी किंवा हरवला आहे का? काळजी नको! सरकारच्या संचार सारथी पोर्टलच्या मदतीने शोधता येणार मोबाईल