Google Bard AI: गूगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी Google चे Bard संभाषणात्मक AI अधिक प्रभावी केले आहे. गूगलने (Google) काही दिवसांपूर्वी त्यांच्या  AI चॅटबॉटमध्ये 40 हून अधिक भाषांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता तुम्ही AI सोबत मराठीतून (Marathi AI) संवाद साधू शकता. मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती, कन्नड, मल्याळम या भाषांचाही Google Bard AI मध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे या सर्व भाषांमध्ये तुम्ही AI सोबत बोलू शकता.


चॅटबॉट देणार तुमच्या प्रश्नांची मराठीतून उत्तरं


गूगलच्या या चॅटबॉटकडून तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती मागू शकता आणि दुसऱ्या क्षणात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हा चॅटबॉट देतो. गूगलच्या AI ने भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे आणि हे वापरणं अगदी मोफत आहे. ChatGPT ने सुद्धा अलीकडेच भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन दिला हे, मात्र त्यासाठी काही शुल्क आकारण्यात येतात. तर गूगलकडून ही सेवा मोफत देण्यात आली आहे. 


मिळवू शकता कोणत्याही प्रकारची माहिती


Google Bard AI या चॅटबॉटकडून तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकता, कोणत्याही प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारु शकता. मिळालेली माहिती अर्धवट वाटली तर त्यावर आणखी प्रश्न विचारु शकता. गुगलच्या चॅटबॉटला तुम्ही फोटो पाठवू शकता आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न देखील विचारु शकता. गूगल बार्ड AI वापरण्यासाठी लिंक: https://bard.google.com/


गूगल Bard AI मध्ये काही प्रमाणात त्रुटी


आम्ही गूगल Bard AI ला काही प्रश्न विचारले, त्यावर आम्हाला योग्य माहिती मिळाली. पण गूगल ट्रान्स्लेटरप्रमाणे गूगलच्या या AI मध्येही काही त्रुटी आढळल्या. तुम्ही चॅटबॉटच्या उत्तरांवर 100 टक्के अवलंबून राहू शकत नाही. गुगलच्या मराठी AI च्या व्याकरणात बऱ्याच चुका असतात, बरेच शब्द आणि वाक्यरचना चुकलेल्या असतात.


आम्ही गूगल Bard AI ला एक साधा प्रश्न विचारला, त्यावर एक नजर टाकूया. हे वाचल्यावर तुम्हाला काही व्याकरणाच्या चुका लक्षात येतील.  गूगल Bard AI ची मराठी भाषा तितकी चांगली नाही. गूगल त्यांच्या AI वर अधिक काम करत आहेत, त्यामुळे लवकरच या चुका सुधारल्या जातील ही अपेक्षा आहे.




AI द्वारे देण्यात आलेली माहिती कधी कधी चुकीची असू शकते, ही टीप खुद्द गुगलकडूनही देण्यात येत आहे. त्यामुळे विचार करुन मिळालेली माहिती आत्मसात केली पाहिजे. काही शंका वाटल्यास ती माहिती गुगलवर टाकून स्वतंत्रपणे सर्च केली पाहिजे. आम्ही गूगल Bard AI काय आहे हे स्वत: त्या AI ला विचारले असता मिळालेले उत्तर पाहा. यातून तुम्हाला त्याच्या कामाचा अंदाज येईल.




हेही वाचा:


GK: रेल्वे तिकिटाशी संबंधित 'हा' नियम तुम्हाला माहित आहे का? ही चूक केल्यास होऊ शकते 3 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड