Google Pay UPI Lite Feature : गुगल पे (Google Pay) चालवणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Google Pay ने UPI Lite हे फिचर भारतात लाँच केलं आहे. या फिचरच्या मदतीने Google Pay यूजर्स आपल्या रोजच्या जीवनातील पेमेंट सोपे आणि फास्ट करू शकतात. UPI Lite फीचर RBI ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिझाईन केलेली ही डिजिटल पेमेंट सेवा आहे. आता UPI Lite च्या मदतीने, तुम्ही UPI-पिन न टाकता एकावेळी 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. याचा अर्थ तुम्हाला किराणा सामान, स्नॅक्स किंवा कॅबसाठी पैसे द्यायचे असल्यास, तुम्ही आता तुमचा पिन न टाकता UPI वापरून जलद पेमेंट करू शकता.


पिन न टाकता पेमेंट केले जाईल


Google Pay च्या म्हणण्यानुसार UPI Lite आता प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कंपनी डिजिटल पेमेंट सोपे, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. UPI Lite Google Pay वर आणले गेले आहे. यामुळे यूजर्सना UPI पिन न टाकता जलद आणि एक-क्लिक UPI व्यवहार करू शकतात. Lite खाते यूजर्सच्या बँक खात्याशी जोडले जाईल. परंतु, रिअल टाईममध्ये बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून नसणार आहे. 


UPI Lite च्या मदतीने, यूजर्स पीक ट्रान्झॅक्शन वेळेतही सहज पेमेंट करू शकतात. यूजर्स दिवसातून दोनदा 2,000 रुपये लोड करू शकतात आणि एका वेळी 200 रुपयांचा व्यवहार करू शकतात. सध्या भारतात 15 बँका UPI Lite पेमेंटला सपोर्ट करतात.


अशा प्रकारे UPI Lite अॅक्टिव्ह करा 



  • Google Pay वर UPI Lite अॅक्टिव्ह करण्यासाठी, सर्वात आधी अॅपमधील प्रोफाईल विभागात जा. 

  • येथे तुम्हाला UPI Lite चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि Continue वर टॅप करा.

  • त्यानंतर तुमचे प्राथमिक बँक खाते निवडलेल्या बँकांच्या यादीमध्ये असल्यास नंतर तुम्ही UPI Lite मध्ये थेट पैसे जोडू शकाल.

  • जर प्राथमिक बँक या वैशिष्ट्यास समर्थन देत नसेल, तर दुसरी बँक जोडा आणि UPI Lite सक्रिय करा 


UPI Lite च्या रोल-आउटबद्दल बोलताना, Google चे VP Product Management Ambrish Kenghe म्हणाले की, NPCI आणि RBI बरोबर भागीदारी केल्याचा कंपनीला अभिमान आहे. ही भागीदारी UPI ची पोहोच आणि उपयुक्तता वाढवेल. यूजर्सना सोयीस्कर आणि सुपरफास्ट पेमेंट अनुभव देऊन व्यवहार सुलभ करणे हे गुगल पेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या :


Chandrayaan-3 : आज अवकाशात झेपावणार चांद्रयान-3, इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा खर्च किती? जाणून घ्या...