Vince Zampella Died in Angeles Crest Highway Crash:व्हिडिओगेम्सच्या जगातून एक दुख:द बातमी समोर येत आहे. कॉल ऑफ ड्यूटी या गेमचेसहनिर्माताविन्सझॅम्पेला यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधनझाले. मीडियारिपोर्ट्सनुसार, विन्सझॅम्पेला यांचा अपघातीमृत्यूझालाआहे. विन्सझॅम्पेलाआलिशानचारचाकीतून दक्षिण कॅलिफोर्नियाच्या दिशेनं जात होते. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता. मात्र, चारचाकीचा भीषण अपघात घडला. क्षणात चारचाकीने पेट घेतला. हा अपघात एंजेलिसक्रेस्टहायवेवर झाला असून, विन्सझॅम्पेला यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेल्या प्रवाशाचा रूग्णालयात मृत्यू झाला.

चारचाकीत 2 जण होते

कॅलिफोर्निया हायवेपेट्रोलने एका निवेदनात म्हटले की, अपघातावेळीचारचाकीमध्ये दोन जण होते. अपघात इतका भीषण होता की, विन्सझॅम्पेलाचा जागीच मृत्यू झाला. तर, चारचाकीतील दुसरा प्रवासी गंभीररित्या जखमी झाला होता. अपघात घडताच स्थानिकांनी त्याला रूग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात नेमका कसा घडला? हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. अपघाताचे मुख्य कारण जसे की, वेग, तांत्रिक बिघाड किंवा इतर कारण, याचा तपास केला जात आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

आलिशानचारचाकीचा भीषण अपघात नेमका कसा घडला?

या भीषण अपघाताचा व्हिडिओसमाजमाध्यमांमध्येव्हायरल होत आहे. हा अपघात दक्षिण कॅलिफोर्नियामधील एंजेलिसक्रेस्टहायवेवर घडला असल्याची माहिती आहे. आलिशानचारचाकी डोंगराळ भागातील बोगद्यातून बाहेर पडते. तसेच वेगाने जाते. यानंतर अचानक चारचाकीचा ताबा सुटतो. चारचाकी थेट काँक्रिट बॅरियरला धडकते. अपघात घडताच क्षणात चारचाकी पेट घेते. चारचाकीमधील दोघांचा अपघाती मृत्यू झाला.

या दुख:द घटनेनंतर इलेक्ट्रॉनिक आर्ट्सनेविन्सझॅम्पेला यांच्या निधनाची पुष्टी करणारे अधिकृत निवेदन जारी केले आहे. EAनंम्हटलं की, विन्स यांनी विविध प्रकारचे व्हिडिओगेम्स तयार केले आहे. त्यांचे गेम्स जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी तयार केलेल्या गेम्समुळे, गेमिंगकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यांचे गेम्स येणार्‍या पिढ्यांना प्रेरणा देत राहिल. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मध्यरात्री 2 पुरूषांनी दार ठोठावलं अन्..; 3 वाजता उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट करत सांगितला विचित्र प्रकार