Ray-Ban Meta Glasses: आजपासून भारतात रे-बॅन मेटा (जेन २) एआय ग्‍लासेस् उपलब्‍ध असणार आहेत. ज्‍यामध्‍ये सर्वोत्तम व्हिडीओ कॅप्‍चर क्षमता, सुधारित बॅटरी लाइफ, अपग्रेडेड मेटा एआय अनुभव आणि उत्‍साहवर्धक स्‍टाइल्‍स आहेत, ज्‍यामध्‍ये आयकॉनिक डिझाइनसह दैनंदिन उपयुक्‍तता आहे. हे कलेक्‍शन देशभरात Ray-Ban India वर आणि आघाडीच्‍या ऑप्टिकल व आयवेअर रिटेलर्सकडे उपलब्‍ध असेल, ज्‍यांची किंमत ३९,९०० रूपयांपासून सुरू होते.  

Continues below advertisement

दैनंदिन जीवनशैलीसाठी नेक्‍स्‍ट-जनरेशन एआय ग्‍लासेस्-

फर्स्‍ट-जनरेशन रे-बॅन मेटा ग्‍लासेसना मिळालेल्‍या यशाच्‍या आधारावर रे-बॅन मेटा (जेन २) शार्पर ३के अल्‍ट्रा एचडी व्हिडीओ कॅप्‍चर, अल्‍ट्रावाइड एचडीआर आणि अपग्रेडेड मेटा एआय अनुभव देते. जवळपास ८ तासापर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी, २० मिनिटांमध्‍ये जवळपास ५० टक्‍क्‍यांपर्यंत फास्‍ट चार्जिंग आणि अतिरिक्‍त ४८ तास पॉवर देणाऱ्या चार्जिंग केससह रे-बॅन मेटा (जेन २) दिवसरात्र कार्यरत राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हायपरलॅप्‍से व स्‍लो मोशन यांसारखे नवीन कॅप्‍चर मोड्स नंतर सॉफ्टवेअर अपडेट्सच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍यात येतील, ज्‍यामुळे कथाकथन अधिक सर्जनशील व सर्वोत्तम बनेल.

नवीन स्‍टाइल्‍स, रंग आणि लिमिटेड एडिशन्‍स-

रे-बॅन मेटा जेन २ दिग्‍गज वेफेरर, आधुनिक स्‍कायलर आणि लोकप्रिय हेडलाइनर स्‍टाइल्‍समध्‍ये लाँच करण्‍यात आला आहे. यंदाची श्रेणी शाइनी कॉस्मिक ब्‍ल्‍यू, शाइनी मिस्टिक व्‍हायोलेट आणि शाइनी अॅस्‍टेरॉईड ग्रे अश आकर्षक रंगांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे.

Continues below advertisement

स्‍मार्ट, अधिक उपयुक्‍त मेटा एआय-

मेटा एआय दैनंदिन स्थितींमध्‍ये अधिक उपयुक्‍त बनले आहे. वापरकर्ते 'हाय मेटा' म्‍हणत त्‍वरित उत्तरे, शिफारशी किंवा क्रिएटिव्‍ह प्रॉम्‍प्‍ट्स मिळवू शकतात. कन्‍वर्जन फोकस लाऊड सेटिंग्‍जमध्‍ये आवाज वाढवतो आणि रे-बॅन मेटा (जेन २)मध्‍ये आता संपूर्ण हिंदीमध्‍ये परस्‍परसंवाद करण्‍याचा सपोर्ट आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते प्रश्‍न विचारणे, फोटो व व्हिडिओ कॅप्‍चर करणे, मीडियावर नियंत्रण ठेवणे आणि संदेशांना प्रतिक्रिया देणे अशा टास्‍क्‍ससाठी मेटा एआयसोबत प्रादेशिक भाषांमध्‍ये संवाद साधू शकतात.

मेटा एआयमध्‍ये आता सेलिब्रिटी एआय वॉईस-

नुकतेच, मेटा एआयने सेलिब्रिटी एआय वॉईस सादर केले, ज्‍यामुळे वापरकर्ते प्रादेशिक भाषांमधील सहाय्यतेसह परस्‍परसंवाद करू शकतात. व्‍यक्‍ती आता दीपिका पदुकोणच्‍या एआय वॉईससोबत परस्‍पसंवाद साधू शकतात. त्‍या सहाय्यतेसाठी मेटा एआयच्‍या वॉईसेसच्‍या जागतिक लाइनअपमध्‍ये सामील झाल्‍या, तसेच निवडण्‍यासाठी अनेक ओळखीचे सेलिब्रिटी आवाज देखील आहेत.

यूपीआय-लाइट पेमेंट्सची चाचणी-

लवकरच, तुम्‍हाला नवीन वैशिष्‍ट्याचा अनुभव मिळेल, जे प्रत्‍यक्ष तुमच्‍या रे-बॅन मेटा (जेन २) ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून सुरक्षितपणे यूपीआर क्‍यूआर-कोड पेमेंट्स करण्‍याची सुविधा देईल. ग्‍लासेस् परिधान करून क्‍यूआर कोडकडे पाहा आणि म्‍हणा 'हाय मेटा, स्‍कॅन अँड पे', ज्‍यासह यूपीआय लाइट पेमेंट पूर्ण होईल आणि तुमच्‍या स्‍मार्टफोनचा वापर करण्‍याची गरज भासणार नाही. तुमच्‍या व्‍हॉट्सअॅपशी लिंक असलेल्‍या बँक खात्‍यामधून पेमेंटची प्रक्रिया होईल, ज्‍यासह दैनंदिन व्‍यवहार जलद आणि अधिक सुलभपणे होतील.