Urfi Javed Recalls Scary Midnight Incident at Her Home: सोशल मिडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे पोशाख हटके असतात. बऱ्याचदा उर्फी आपल्या अतरंगी पोशाखामुळे ट्रोल होते. पण सध्या उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. दोन पुरूषांनी उर्फीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबई पोलीस स्टेशनचा फोटो शेअर केला. तसेच दोन पुरूषांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत माहिती दिली.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्फी जावेदने खुलासा केला की, "22 डिसेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास, एक अज्ञात व्यक्ती वारंवार दाराची बेल वाजवत होती. नंतर कळले की दाराबाहेर एक नसून दोन व्यक्ती आहेत. दोन्ही अज्ञात व्यक्ती जात नव्हते", असं उर्फी म्हणाली. यानंतर उर्फीने पोलिसांची मदत घेतली. उर्फीने फोन करून पोलिसांना बोलवून घेतले. पोलीस घटनस्थळी दाखल झाल्यानंतर दोन्ही अज्ञात व्यक्ती निघून गेले होते, अशी माहिती उर्फीनं दिली.
उर्फीसोबत गैरवर्तन, मध्यरात्री नेमकं घडलं?
उर्फीने २२ डिसेंबरच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. "2 पुरुष 10 मिनिटे दाराची बेल वाजवत होते. यानंतर मी त्यांना निघून जाण्यास सांगितले. पण अज्ञात व्यक्तींनी बाहेर जाण्यास नकार दिला. मी दोघांना धमकी दिली. पोलिसांना फोन करेन असा इशाराही दिला होता. पण तरीही दोघे निघून गेले नाही. जेव्हा पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले", अशी माहिती उर्फीनं मुलाखतीतून दिली.
उर्फी म्हणाली, "तो खूप भयानक अनुभव होता. जेव्हा कुणी मध्यरात्रीच्या सुमारास दार ठोठावते. तेव्हा काय करावं हे सुचत नाही. विशेषत: मुली जेव्हा घरी एकट्या असतात आणि अज्ञात व्यक्ती घराबाहेर जात नाही, तेव्हा आणखी आणखी भीती वाटते". दरम्यान, उर्फीने अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात काय कारवाई केली जाईल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, या प्रकारानंतर उर्फींनं ही संपूर्ण घटना समाजमाध्यमांमध्ये शेअर केली. तसेच चाहत्यांनीही या भयानक प्रकारावर प्रतिक्रिया दिली. उर्फीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
धक धक गर्ल झाली होती ट्रोलिंगचा शिकार; नाक अन् बारीक असण्यावरून लोकांनी चिडवलं; तेजाब चित्रपटानंतर..