Redmi 13C : रेडमीचा नवा स्मार्टफोन (Redmi 13C) येत्या काही दिवसात बाजारात येणार आहे. एका मोठ्या ग्लोबल इव्हेटमध्ये हा फोन लॉंच केला जाणार आहे. रेडमी 13 C भारतासह जागतिक स्तरावर लाँच (Smartphone launch) केला जाणार आहे. हा फोन स्टार शाईन डिझाइनमध्ये येणार आहे. हा फोन 6 डिसेंबर रोजी (6 December launch Date ) लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, फोनच्या विक्रीची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. 


या फोनचे काही फिचर्स लिक झाले आहेत. या फोनचा कलर आणि काही नवे फिचर्सची माहिती मिळत आहे.  हा फोन डस्ट ब्लॅक आणि स्टार शाईन ग्रीन या दोन कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. रेडमीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, रेडमी 13 सी स्मार्टफोन 50 MP कॅमेरा सेन्सरसह येणार आहे. फोनमध्ये एकूण तीन रिअर कॅमेरे असणार आहे. 


मोबाईलचे खास फिचर्स


रेडमीचा दावा आहे की, रेडमी 13 C हा फीचर लोडेड अफोर्डेबल स्मार्टफोन असेल. रेडमी 13 C या  फोनची बाकी फोनची तुलना केली तर असा बाजारात सध्या एकही फोन उपलब्ध नाही आहे. यात 50 MP चा Camera Sensor आहे. तर 2 MP चा Macro कॅमेरा सेन्सर दिला जाणार आहे. शाओमी ग्लोबल वेबसाइटनुसार, रेमडी 13 C स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा डिस्प्ले असेल, जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी असेल G 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. प्रोटेक्शनबद्दल बोलायचे झाले तर फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सपोर्टसोबत येईल. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये मीडियाटेक हेलियो G 85 सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 16 GB RAM सपोर्ट असेल.


मोबाईलची किंमत किती?


सध्या सगळ्याच मोबाईल कंपन्या कमी किमतील चांगले फिचर्स देण्याच्या तयारीत दिसत आहे. सगळ्याच कंपनी आपल्या फोनमध्ये नवनवे फिचर्स लॉंच करत आहे. त्यात कॅमेऱ्यापासून ते बॅटरीपर्यंत बदल करण्यात येत आहे. कमी पैशात उत्तम स्मार्टफोन तयार करण्याकडे अनेकांचा कल दिसत आहे. त्यातच आता रेडमी सारख्या कंपन्या अनेक फोन भन्नाट फिचर्स सोबत बाजारात आणत आहे. या फोनचे फिचर्सदेखील भन्नाट आहेत आणि किंमत देखील कमी आहे.  रेडमी 13 C याची किंमत साधारणपणे 10 ते 15 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Kia Seltos Facelift Price : Kia Seltos Facelift कारच्या किंमतीत घसरण; काय आहे कारण?