Kia Seltos Facelift Price: नव्या किया सेल्टॉस गाडीने आपल्या लुक आणि भन्नाट फिचर्समुळे अनेक कुटुंबियांचा महत्वाचा भाग झाली आहे. मॉडेल लाइनअप आता सात ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 10.90 लाख रुपयांपासून 19.80 लाख रुपयांपर्यंत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अलीकडेच त्याच्या किंमत कमी झाली आहे. कियामधील काही गाड्यांची किंमत कमी करण्यात आली आहे. 


1.5-लीटर पेट्रोल एमटी एचटीएक्स, 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल आयएमटी एचटीएक्स +, 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल डीसीटी जीटीएक्स +(एस), 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल डीसीटी जीटीएक्स +, 1.5-लीटर डिझेल आयएमटी एचटीएक्स + आणि 1.5-लीटर डिझेल जीटीएक्स + (एस) या सर्व ांच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या इतर व्हेरियंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एचटीएक्स आणि त्यावरील व्हेरियंटमध्ये एक्स-लाइन सोडून यापुढे सर्व पॉवर विंडोजसाठी वन-टच अप / डाउन फंक्शन नसल्यामुळे ही किंमत ट्रेड-ऑफसह येते. त्यामुळे ही दरकपात काही प्रमाणात योग्य मानता येईल. 


Advanced driver assistance systems  आणि Sunroof


या बदलांनंतरही किआ सेल्टोस फेसलिफ्ट हा बाजारात चांगला पर्याय आहे. हे Advanced driver assistance systemsआणि पॅनोरॅमिक सनरूफसह अधिक लोकप्रिय आहे. एडीएएस सूटमध्ये लेन कीप असिस्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग असिस्ट आणि एसयूव्हीमध्ये सुरक्षा वाढवणारी इतर भन्नाट फिचर्स आहेत. सर्व व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग, हिल स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ऑल व्हील डिस्क ब्रेक, रिमाइंडरसह सर्व प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम देण्यात आली आहे.


भन्नाट फिचर्स अन् बरंच काही!


तसेच या एसयूव्हीमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, साऊंड मूड लॅम्पसह बोस 8-स्पीकर सिस्टम, 8 इंच हेड-अप डिस्प्ले (एचयूडी) युनिट, रेन सेन्सिंग वायपर्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360 डिग्री कॅमेरा, 10.25 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, 8-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट आणि बरेच काही समाविष्ट करण्यात आलं आहे. 



नवीन किआ सेल्टोस मध्ये 115 बीएचपी, 144 एनएम, 1.5 लीटर पेट्रोल, 116 बीएचपी, 250 एनएम, 1.5 लीटर टर्बो डिझेल आणि नवीन 160 बीएचपी, 253 एनएम, 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन सह तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यात 6-स्पीड मॅन्युअल, सीव्हीटी, 6-स्पीड आयएमटी, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड डीसीटी चा पर्याय आहे.


इतर महत्वाची बातमी-


Difference Between Mixer Grinder And Blende : मिक्सर ग्राइंडर आणि ब्लेंडरमध्ये काय फरक आहे, तुमच्या स्वयंपाकघरासाी काय उपयुक्त?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI