iPhone 12 Offers : तुम्ही जर Android सोडून अॅपल (iPhone 12) इकोसिस्टमकडे वळण्याचा विचार करत असाल तर त्याच्यासाठी ही योग्य वेळ ठरू शकते. कारण तुम्ही अत्यंत कमी बजेटमध्ये आयफोन 12 ची ऑर्डर देऊ शकता. आयफोन 15 आल्यानंतर हे थोडं जुनं व्हर्जन आहे, असं म्हणता येईल. आयफोन 12 अजूनही मोठी मागणी असलेला स्मार्टफोन आहे, विशेषत: ज्यांना iOS वर स्विच करायचे आहे त्याच्यासाी बेस्ट ऑप्शन आहे. फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यास हा फोन केवळ 30 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे.


17 टक्के डिस्काउंट मिळणार


जर तुम्हाला एखादा जुना स्मार्टफोन एक्स्चेंज करायचा असेल, तर तो तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो. फ्लिपकार्टवरून फोनची ऑर्डर केल्यास तुम्हाला 17 टक्के डिस्काउंट मिळू शकतो. या फोनची अधिकृत किंमत 49,900 रुपये आहे. तर सध्या तो 40, 999 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय फोनवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही येत आहेत.


कार्ड पेमेंटवर ऑफर्स


सध्या आम्ही 64 जीबी स्टोरेज व्हेरियंटबद्दल बोलत आहोत. तर या फोनचे अधिक स्टोरेज असलेले व्हेरियंटही उपलब्ध आहे. हे व्हेरियंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. आयफोन 12 वर बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला स्वतंत्रपणे 1 हजार रुपयांची सूट मिळू शकते, परंतु यासाठी तुम्हाला अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट करावे लागेल. हीच ऑफर सिटी बँक क्रेडिट कार्डवर सुरू आहे.


भन्नाट ऑफर्स


याशिवाय तुम्हाला अनेक ऑफर्स मिळू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवर जावे लागेल. इथून तुम्हाला जास्त डिस्काऊंटही मिळू शकतो. यावर्षी सप्टेंबरमध्ये एक अहवाल समोर आला होता, ज्यात फ्रान्समध्ये आयफोन 12 च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा फोन परवानगीपेक्षा जास्त रेडिएशन तयार करतो, असा दावा करण्यात आला होता. मात्र, त्याचे प्रमाणपत्र अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेण्यात आल्याचे अॅपलने स्पष्ट केले होते.


आयफोन 12 फिचर्स


आयफोन 12 हा मोबाईल 13 ऑक्टोबर 2020 रोजी लाँच करण्यात आला होता. हा फोन 1170*2532 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.10  इंचाचा टचस्क्रीन डिस्प्लेसह येतो. याची पिक्सेल घनता 460 पिक्सेल प्रति इंच (पीपीआय) आस्पेक्ट रेशियो आहे. डिस्प्लेमध्ये इतरही अनेक प्रकारचे प्रोटेक्शन आहे. आयफोन 12 फोनमध्ये हेक्सा-कोर अॅपल A 14 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. आयफोन 12 वायरलेस चार्जिंग आणि प्रोप्रायटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. आयफोन 12 फोन आयओएसवर काम करतो आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. आयफोन 12 हा ड्युअल सिम (जीएसएम आणि जीएसएम) मोबाइल आहे जो नॅनो सिम आणि ई-सिम कार्डसह येतो.


महत्वाच्या इतर बातम्या : 


How To Clean Laptop Keyboard : एका टॉयलेट सीटवर जेवढे जंतू असतील, तेवढेच तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर असतात; लगेच स्वच्छ करा, नाहीतर...