NoMoPhobia : आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात जग वेगाने बदलत आहे. यासोबत तंत्रज्ञानातही वेगाने बदल होत आहेत. या बदलत्या तंत्राज्ञानाचा उपयोग जसा माणसाचं आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी होतो, तसाच याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे. तसेच मोबाईल हे सध्या संपर्काचं मोठ माध्यम आहे. आता मोबाईलशिवाय एकही व्यक्ती राहू शकत नाही. इतकं मोबाईलने आपल्या आयुष्यात शिरकाव केला आहे. अशातच स्मार्टफोनशी संबंधित एक चिंताजनक रिपोर्ट समोर आला आहे. ओपो आणि काऊंटरपॉईंट रिसर्चच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, प्रत्येकी चार पैकी तीन भारतीयांना NOMOPHOBIA च्या आजाराने ग्रस्त आहेत. या रिपोर्टनुसार, भारतात 72 टक्के लोकांना मोबाईलची बॅटरी 20 टक्क्यापर्यंत येताच 'लो बॅटरी एन्झायटी'ची लक्षणे दिसून येतात. तर 65 टक्के लोकांना इमोशनल डिस्कम्फर्टसारखी चिंता सतावते, अस्वस्थ होणं, काही तरी सुटण्याची भीती, डिस्कनेक्ट होण्याची भीती आणि सतत भितीच्या दडपणाखाली राहणं अशी लक्षणे दिसून आली आहेत. अशी तुमच्यातही लक्षणे दिसून येत असतील, तर तुम्ही  NOMOPHOBIA च्या आजाराने ग्रस्त आहात. याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया...


NOMOPHOBIA आहे तरी काय?


नोमोफोबिया हा मोबाईल फोबियाशी संबंधित मानसिक आजार आहे. या अवस्थेतील व्यक्तीला मोबाईलचं व्यसन लागलेलं असतं. व्यक्ती मोबाईपासून एक क्षणही दूर राहू शकत नाही. याच कारण व्यक्ती मोबाईलच्या पूर्ण आहारी गेलेली असते.


रिपोर्ट भारतीयांसाठी चिंताजनक


चीनची मोबाईल फोन निर्मिती करणारी कंपनी ओप्पो आणि काऊंटरपॉईंट रिसर्चने स्मार्टफोनशी वापर करणाऱ्या लोकांवर एक संशोधन केलं होतं. या संशोनाला ‘NoMoPhobia: Low Battery Anxiety Consumer Study’ असं नाव देण्यात आलं होतं. या रिपोर्टमध्ये  47 टक्के भारतीय दिवसभरात दोनवेळा मोबाईल फोन चार्ज करतात, तर जवळपास 87 टक्के भारतीयांना चार्जिंग सुरु असताना मोबाईल फोन वापरण्याची सवय आहे. तसेच मोबाईलची बॅटरी लो दाखवत असेल, तर 74 टक्के महिला अस्वस्थ फिल करतात, तर हेच पुरुषांमधील प्रमाण 82 टक्के इतकं असल्याचं सांगितलं आहे. या रिपोर्टमध्ये पुढे जवळपास 60 टक्के लोक हे बॅटरी परफॉर्म करत नसेल, तर आपला मोबाईल फोन बदलतता. यासोबत 92.5 टक्के लोक बॅटरीची चार्जिंग जास्त वेळ टिकावी म्हणून मोबाईलमधील पॉवर-सेविंग मोडचा ऑप्शन ऑन करुन ठेवतात. तर 40 टक्के लोक आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट मोबाईल फोनच्या वापराने करत असल्याचं संशोधनातून आढळून आलं आहे. यावरुन भारतीयांमध्ये मोबाईल फोबियाचं प्रमाण चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे.


ओप्पो इंडियाच्या सीएमओ काय सांगितलं?


मोबाईल फोबियाचा रिपोर्ट आल्यानंतर ओप्पो इंडियाचे सीएमओ दमयंत सिंह खनोरिया यांनी सांगितले की, या रिपोर्टमुळे आम्हाला ग्राहकांचं वर्तन समजून घेण्यास मदत होणार आहे. कारण प्रॉडक्ट्समध्ये आवश्यक ते बदल करता येतील. त्यांनी सांगितले की, कंपनीचा उद्देश प्रॉडक्ट्स वापल्यानंतर लोकांमध्ये जास्त काळ टिकणारी मूल्य आणि दयाळूपणा या भावनांची निर्मिती होईल. दुसरीकडे काऊंटर पॉईंट रिसर्चचे रिसर्च अध्यक्ष तरुण पाठक यांनी सांगितलं की, सध्या स्मार्टफोन्स आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि याचं कारण लोक मोबाईलच्या इतके आहारी गेले आहेत की फोनशिवाय राहू शकत नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे सर्वाधिक अस्वस्थता 31 ते  40 वयोगटातील काम करणाऱ्या लोकांमध्ये दिसून आली आहे. यानंतर 25 ते 30 वयोगटातील तरुणाईचा समावेश आहे.