Mobile Safety Tips : जेव्हापासून स्मार्टफोन (Smartphone) आलेत त्यामुळे आपल्या अनेक समस्या दूर झाल्यात. हे जरी खरं असतं, तरी यामुळे अनेकदा नकळत आपलं नुकसान होतं. कारण टचस्क्रीन फोनमध्ये कधीकधी एक समस्या येते ती म्हणजे तुम्ही चुकून कुठेही स्पर्श केल्यास वेगळंच ब्राऊजर किंवा अॅप ओपन होतं. अशा वेळी तुमच्याही नकळतपणे तुमच्या मोबाईलमधून (Mobile) तुमचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट झालेत का? आणि आता हे फोटो, व्हिडीओ परत कसे मिळवायचे हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तुमचं जर उत्तर हो असेल तर घाबरण्याची गरज नाही. तुमचे डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ (Video) परत कसे मिळवायचे या संबंधी आम्ही तुम्हाला माहिती सांगणर आहोत.
यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटो आणि व्हिडीओचा बॅकअप तुम्हाला मिळेल.
'या' स्टेप्स फॉलो करा
- यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Play Store वरून DiskDigger ॲप इन्स्टॉल करा.
- अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा.
- या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील. ज्यामध्ये पहिला ऑप्शन फोटोचा आहे आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला व्हिडीओ दिसतील.
- या ठिकाणी सर्व फोटो आणि व्हिडीओ तुमच्या स्क्रीनवर दाखवले जातील.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या फोनमधील लेटेस्ट डेटा मिळू शकतो. जर तुम्ही काही वर्षांपूर्वी फोटो डिलीट केले असतील तर तुम्हाला तो डेटा परत मिळणार नाही.
फोटो आणि व्हिडीओ असे करा रिकव्हर
या ॲपला गुगल प्ले स्टोअरवर 3.5 रेटिंग मिळाले आहे. आतापर्यंत 100 मिलियनहून अधिक लोकांनी हे ॲप प्लॅटफॉर्मवरून इंस्टॉल केलं आहे. तुम्हाला हे ॲप वापरायचं असेल तर तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. या अॅपचं रेटिंग तपासा.
फोनमधील स्टोरेजची समस्या दूर होईल
जर तुम्हाला फोन स्टोरेजची समस्या येत असल्यास यावरही पर्याय आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. या ठिकाणी Android यूजर्स Free Up Space वर क्लिक करा. जेव्हा जेव्हा तुमच्या फोनचे स्टोरेज भरलेले असते, तेव्हा पहिल्या जागा मोकळी करा आणि स्टोरेज तयार करा. हे केल्यानंतर, तुमच्या फोनमधून न वापरलेले ॲप्स, गाणी, व्हिडीओ आणि फाईल्स डिलीट करा. असे केल्याने तुमच्या फोनमध्ये बरीच जागा तयार होईल.
महत्त्वाच्या बातम्या :