WhatsApp New Feature : सोशल मीडियावरील (Social Media) व्हॉट्सअप (Whatsapp) हे सर्वांचं लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. जगभरातील तब्बल 200 कोटींहून अधिक लोक या अॅपचा वापर करतात. आपल्या यूजर्सच्या सोयीसाठीही व्हॉट्सअप सतत आपल्या अॅपमध्ये नवीन बदल घेऊन येत असतात. आता व्हॉट्सअपने स्टेटस सेक्शनमध्ये देखील एक नवीन आणि भन्नाट फीचर घेऊन येत आहे. तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप स्टेटस पोस्ट करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे.
व्हॉट्सॲप आपल्या ॲपमध्ये ग्राहकांना सतत नवीन फीचर्स देत असतं. काही फीचर्स हे यूजर्सची प्रायव्हसी मेंटेन करतात तर, काही सुरक्षिततेची संबंधित असतात. तर, काही फीचर्स यूजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी असतात. व्हॉट्सॲप आता स्टेटस सेक्शनमध्ये एक नवीन फीचर जोडणार आहे. या फीचरमुळे तुम्हाला तुम्ही ज्या यूजर्ससाठी स्टेटस पोस्ट केलं आहे त्यांना तुमच्या स्टेटसची माहिती लगेच मिळेल.
आता यूजर्सला वाट पाहावी लागणार नाही
व्हॉट्सॲपवर सध्या फक्त 24 तासांसाठी तुमचं स्टेटस अॅक्टिव्ह असतं. अनेकदा आपण खास व्यक्तीसाठी स्टेटस ठेवतो. पण, त्या व्यक्तीने स्टेटट पाहिलं का हे पाहण्यासाठी आपण वारंवार स्टेटट चेक करतो. अशा वेळी 24 तासांनंतरही त्या व्यक्तीने स्टेटस पाहिलं नाही तर निराशा होते. व्हॉट्सअपने याच समस्येवर उपाय शोधला आहे. आता ज्या व्यक्तीसाठी व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट केले गेले आहे त्याने ते पाहिले की नाही याची वाट पाहावी लागणार नाही.
कंपनीने संपर्कांचा उल्लेख जाहीर केला
खरंतर, व्हॉट्सॲपने आता स्टेटसमध्ये कॉन्टॅक्टसही मेंशन करण्याचा पर्याय दिला आहे. कंपनी खूप दिवसांपासून या फीचरवर काम करत होती. आता कंपनीने हे फीचर बीटा यूजर्ससाठी आणले आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही ज्या व्हॉट्सॲप युजरचा तुमच्या स्टेटसमध्ये उल्लेख कराल त्याला लगेच तुमच्या स्टेटसचं नोटिफिकेशन मिळेल.
व्हॉट्सॲपने आपल्या नवीन फीचरला स्टेटस मेन्शन (Status Mention) असं नाव दिलं आहे. व्हॉट्सॲप मॉनिटरिंग वेबसाईट व्हॉट्सॲपच्या मते, व्हॉट्सॲपने नुकतेच व्हॉट्सॲप अँड्रॉईड 2.24.6.19 बीटा अपडेटमध्ये हे नवीन फीचर आणले आहे. जर तुम्हाला हे फीचर वापरायचे असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून व्हॉट्सॲपचे बीटा व्हर्जन डाऊनलोड करून इंस्टॉल करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :