मुंबई : स्मार्टफोन (Smartphones) वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण यामध्ये असणाऱ्या लोकेशन (Location) सेटिंगमुळे तुमच्या फोनची माहिती हॅकर्सना मिळवणं अगदी सहज आणि सोपं आहे. तसेच अॅप ट्रकरला देखील तुम्ही परवानगी देण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. कारण यामुळे तुमच्या फोनमधील ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेणं अगदी सहज सोपं आहे. तुम्ही  VPN ॲप्स वापरण्यापूर्वी सुद्धा विचार करायला हवा. कारण या VPN ॲप्समुळे हॅकर्सना तुमच्या फोनपर्यंत पोहचणं अगदी सोपं होऊ शकतं. 


स्मार्टफोनच्या वापरत असताना तुम्ही केलेल्या एका चुकीमुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आज अशाच काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरु शकतात. या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीत तर तुमचा स्मार्टफोन हॅक होणार नाही. हल्ला आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुमच्या बँक खात्यांची माहिती देखील फोनमध्ये असते. त्यामुळे जर तुमचा फोन हॅक झाला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यावर होऊ शकतो. 


लोकेशन


आपल्या फोनमध्ये लोकेशनचा पर्याय असतो. पण हा पर्याय वापरताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. कारण लोकेशनच्या मदतीने समोरच्या अॅपला तुमच्या फोनमधील माहिती मिळू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घेतली पाहिजे की, तुमच्या स्मार्टफोनचे लोकेशन हे लॉक केलेले असेल आणि इतर कोणीही त्याचा वापर करु शकणार नाही. तसेच लोकेशन ॲक्सेस देण्यापूर्वी प्रत्येक ॲपची सर्व माहिती योग्य तपासून घेणे देखील आवश्यक असते. 


इतर अॅप ट्रकर्स बंद करणे


जेव्हा आपण एखादं नवं अॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करतो, त्यावेळी तुमच्या अॅपमध्ये ॲप ट्रॅकर्सची परवानगी मागितली जाते. ही परवानगी देताना देखील आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. अनेक वेळा ॲप तुम्हाला इतर ॲप्स वापरण्याची परवानगी विचारते. ही परवानगी देण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कारण हा ॲक्सेस दिल्याचा अर्थ असा होतो की तो इतर ॲप्सचा डेटाही गोळा करू शकतो. याशिवाय हे ॲप तुमच्या सोयीनुसार सेट करून तुमच्या दिवसभरातील हालचालींवर लक्ष ठेवते.


VPN Apps-


हॅकर्स बऱ्याच काळापासून VPN ॲप्स वापरत आहेत. हे ॲप्स युजर्सचा संपूर्ण फोन हॅक करु शकतात. त्यामुळे VPN ॲप्स वापरण्यापूर्वी तुम्ही विचार केला पाहिजे. सहसा, हॅकर्स युजर्सवर हे ॲप्स वापरण्यासाठी वारंवार नोटिफिकेशन पाठवतात. पण अनेकदा यानंतर यामुळे बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपण या गोष्टींबद्दल खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच  VPN ॲपचा वापर देखील स्मार्टफोनमध्ये करणं टाळावं. 


ही बातमी वाचा : 


Valentine's Day च्या आधी या स्मार्टफोन्सवर मिळतेय भन्नाट ऑफर, 40 टक्क्यांपर्यंत मिळणार डिस्काऊंट