Shark Tank India : सोशल मीडिया ॲप इन्स्टाग्रामची लोकप्रियता तर सर्वांनाच ठाऊक आहे. युट्युबप्रमाणे इन्स्टाग्रामवरुन (Instagram) देखील लोक लाखो रुपये कमवत आहेत. इन्स्टाग्रामवर कमाई करण्यासाठी अनेक फॉलोअर्सची आवश्यकता असते, ज्यासाठी लोक बरीच मेहनत घेत असतात. आता तुम्हीही केवळ हजार फॉलोअर्स असताना इन्स्टाग्रामवरुन कमाई करू शकतात, यासाठीचा सर्वात सोपा मार्ग आज जाणून घेऊया. शार्क टँक इंडिया शोमध्ये WYLD नावाचा स्टार्टअप समोर आला, जो तुम्हाला इन्स्टाग्राम पोस्ट, व्हिडीओसाठी चांगला कॅशबॅक देत आहे.
WYLD नेमकं आहे तरी काय?
WYLD नावाच्या स्टार्टअपने शार्क टँक इंडिया शोमध्ये प्रेझेंटेशन दिलं. WYLD हे एक शॉपिंग कार्ड आहे, जे व्हिसावर आधारित आहे. याचं व्हर्च्युअल व्हर्जन देखील उपलब्ध आहे, जे ॲपद्वारे चालवता येतं. WYLD कार्डच्या मदतीने तुम्ही खरेदी आणि खाद्यपदार्थांच्या ऑर्डरवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. त्याच्या प्रेझेंटेशनदरम्यान, वाइल्डने 1000 रुपयांच्या खरेदीवर त्याला 600 रुपयांचा कॅशबॅक कसा मिळतो हे दाखवलं आहे.
Instagram वरुन कसे कमवायचे पैसे?
सीईओ आणि सीओओसह तीन लोक WYLD च्या सादरीकरणासाठी आले होते. या पिचिंग दरम्यान त्यांनी सांगितलं की, इंस्टाग्राम पोस्टच्या मदतीने देखील तुम्हाला भरपूर कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी इंस्टाग्रामवर किमान 1000 फॉलोअर्स असावेत. ही डील शोमधील प्रत्येक गुंतवणूकदाराला आवडली आणि शेवटी WYLD ने Shaadi.com चे CEO अनुपम मित्तल यांच्यासोबत डील फायनल केली. 75 लाखांवर त्यांनी 1.50% इक्विटीची ऑफर दिली.
WYLD हे ॲप आधारित प्लॅटफॉर्म आहे. WYLD हा ॲप IOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या ॲपमध्ये वापरकर्त्यांना जास्तीत जास्त 80 टक्के कॅशबॅक मिळेल. यासाठी WYLD डेव्हलपरने ॲल्गोरिदम तयार केला आहे. क्रेडिट स्कोअर प्रमाणे, यात वाइल्ड स्कोर (WYLD Score) आहे, जो पोस्टच्या प्रसिद्धीनुसार किंवा पोस्ट रिचनुसार कॅशबॅक ठरवतो.
सह-संस्थापकांनी सांगितलं की, ज्यांचा स्कोर 900 ते 1000 आहे, त्यांना WYLD इन्स्टाग्राम पोस्टवर 100% कॅशबॅक आणि स्टोरीवर 80% कॅशबॅक देईल. शार्क टँक इंडियामध्ये (Shark Tank India) ही माहिती देण्यात आली आहे.
WYLD कसे काम करते?
WYLD वर कमाई करण्यासाठी काही अटी देखील आहेत. WYLD या ॲपवर लॉग इन केल्यानंतर वापरकर्ते बँकेतून वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकतात. यानंतर, WYLD पार्टनर स्टोअरमधून शॉपिंग आणि फूड ऑर्डरचे फोटो क्लिक करा आणि ते इंस्टाग्रामवर पोस्ट करा. या दरम्यान तुम्हाला WYLD ॲपद्वारे पेमेंट करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लवकरच कॅशबॅक मिळून जाईल. या कॅशबॅकने मिळालेल्या पॉईंट्सने तुम्हाला कुठेही शॉपिंग आणि फूड ऑर्डर करता येते.
WYLD च्या अटी काय?
WYLD साठी काही अटी देखील आहेत, यामध्ये युजर्स एका महिन्यात एका ब्रँडच्या 2 पोस्ट करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही Lenskart च्या एका महिन्यात दोनपेक्षा जास्त पोस्ट करू शकत नाही.
हेही वाचा: