मुंबई : फेब्रुवारी (February) महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेकांनी आपल्या व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day) तयारी सुरू केली आहे. तुम्ही स्मार्टफोन (Smartphone) किंवा इतर कोणतेही गॅजेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. खरंतर, ॲमेझॉन इंडियावर व्हॅलेंटाइन डे स्मार्टफोन स्टोअर सुरू झाले आहे. या कालावधीत स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. सेलदरम्यान सॅमसंग ते वनप्लस ते स्वस्त दरात हँडसेट खरेदी करण्याची संधी आहे. या काळात अनेक मोबाईलवर चांगल्या डील उपलब्ध आहेत. यामध्ये स्मार्टफोन हे आकर्षक किंमतींसह उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच यामध्ये विविध प्रकारांचा समावेश करण्यात आलाय. या सर्व डिल्स आणि ऑफर्स विषयी सविस्तर जाणून घेऊयात.
OnePlus Nord CE 3 Lite
व्हॅलेंटाईन स्टोअर पेज Amazon India वर सुरु करण्यात आले आहे. OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन हा 18,999 रुपयांच्या आकर्षक किंमतीसह उपलब्ध आहे. तसेच OnePlus 12 देखील 63,999 रुपयांच्या आकर्षक किंमतींमध्ये या स्टोअरवर आहे. तसेच OnePlus 11R ची किंमत 38,999 रुपये ठेवण्यात आलीये.
Redmi
Redmi 12 5G या पेजवर आहे. या सेलमध्ये, Redmi 12 5G ची आकर्षक किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. Redmi 12 5G मध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आहे. यात 90Hz च्या रिफ्रेश रेटसह FHD+ डिस्प्ले आहे. यात 50MP चा रियर कॅमेरा आहे. हा हँडसेट 8MP सेल्फी कॅमेरासह येतो. यात 5000mAh बॅटरी आहे.
पोको स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध
Amazon India देखील व्हॅलेंटाईन डे पासून स्वस्त दरात Poco हँडसेट ऑफर करत आहे. या सेलमध्ये अनेक Poco हँडसेट उपलब्ध आहेत. यामध्ये Poco C51, Poco C55 सारख्या हँडसेटचा समावेश करण्यात आलाय. त्यांची आकर्षक किंमत ही अनुक्रमे 5999 आणि 7299 रुपये आहे.
iQOO आणि Nokia देखील स्वस्त दरात उपलब्ध
या पेजवर, iQoo Z7s 5G, iQoo Z7 Pro 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ज्यांची आकर्षक किंमत अनुक्रमे 15,999 रुपये आणि 22999 रुपये आहे. याशिवाय, नोकिया G42 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ज्याची प्रभावी किंमत 12499 रुपये आहे.
iPhone 13 वरही डिस्काऊंट
व्हॅलेंटाइन डेज स्टोअरमध्ये 50,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत iPhone 13 खरेदी करण्याची संधी आहे. हा हँडसेट ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. याशिवाय, Samsung Galaxy S24 ची आकर्षक किंमत 84999 रुपये आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज मिळणार आहे. अधिकृत वेबसाइटवर त्याची किंमत 89,999 रुपये आहे.
ही बातमी वाचा :
Apple iPhone : सॅमसंगला अॅपलचं खुलं आव्हान! येणार नवं फोल्डेबल डिवाइस