Valentines Day 2024 : व्हॅलेंटाईन डेला (Valentines Day 2024) तुमच्या जोडीदाराला नवीन Apple iPhone 15 भेटवस्तू द्यायचा असेल, तर iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हे मॉडेल 13,901 रुपयांपर्यंत स्वस्तात विकले जात आहे. हा फोन 79,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, परंतु आम्ही तुम्हाला या फोनवर मोठ्या डिस्काउंटचा फायदा कसा घेऊ शकता ते सांगतो.


लॉन्च किंमतीपेक्षा 13,901 रुपये स्वस्त


Apple ने iPhone 15 चा 128 GB स्टोरेज व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत 79,900 रुपयांना लॉन्च केला आहे. पण सध्या iPhone 15 चा 128 GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 65 हजार 999 रुपयांना लिस्ट झाला आहे. याचा अर्थ हा फोन सध्या त्याच्या लॉन्च किंमतीपेक्षा 13,901 रुपये स्वस्त विकला जात आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करताना अतिरिक्त पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही फ्लिपकार्ट ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.


जरी आयफोन 15 वर अनेक ऑफर्स सूचीबद्ध आहेत, तरीही तुम्ही डीबीएस बँक आणि बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंटवर 10 टक्के (रु. 1500 पर्यंत) बचत करू शकाल. फोनसोबत नो-कॉस्ट EMI सुविधा उपलब्ध नाही पण तुम्ही हा फोन 2321 रुपये प्रति महिना प्रारंभिक EMI पर्यायाने खरेदी करू शकता.


आयफोन 15 स्पेफिकेशन (iPhone 15 Specifications) 


ॲपल कंपनीच्या या लेटेस्ट आयफोन मॉडेलमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. याशिवाय स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या डिवाइसमध्ये A16 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर सोबत 12-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेंसर आहे.


फोनच्या पुढील बाजूस सेल्फीसाठी 12-मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय, या फोनमध्ये तुम्हाला ॲपलच्या सर्वात खास फीचर डायनॅमिक आयलंडचा फायदा देखील मिळेल, या फीचरच्या मदतीने तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या भागात अलर्ट आणि लाईव्ह ॲक्टिव्हिटी दाखवल्या जातील.


इतर महत्वाच्या बातम्या