Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. तब्बल सात तासांच्या चर्चेनंतर अनुराग ठाकूर यांना कुस्तीपटूंना अश्वासन दिलेय. 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु असे अश्वासन अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिले. त्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतलाय. अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीला कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक उपस्थित होते. कुस्तीपटूंनी या बैठकीत 5 मागण्या केल्या. यामध्ये बृजभूषण सिंह यांना अटकेच्या मागणीवर जोर दिला.  


पैलवानांसोबत सकारात्मक चर्चा झाली. 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु असे अनुराग ठाकूर यांनी आश्वासनल दिले. त्यानंतर पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित झालेय. बजरिंग पुनिया यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगितलेय. तसेच बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करु, असंही साक्षीने स्पष्ट केलं.









गृहमंत्री अमित शाह यांनी दिले 'हे' आश्वासन 
"या प्रकरणात पोलीस योग्य ती चौकशी करत आहेत, तसेच कायदा योग्य तो न्याय नक्की करेल," असं आश्वासन अमित शाह यांनी कुस्तीपटूंना दिलं. परंतु जेव्हा कुस्तीपटूंनी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली तेव्हा अमित शाह यांनी 'घाईत कोणताही निर्णय न घेता समजुतीने निर्णय घ्यावेत,' असा सल्ला देखील कुस्तीपटूंना दिला. पुढे बोलताना अमित शाह यांनी कुस्तीपटूंना विचारले की, "पोलिसांना योग्य चौकशी करण्यासाठी पुरेसा वेळ नको का द्यायला?" तर दुसरीकडे बजरंग पुनिया यांनी सोनीपत इथे जाऊन 'आता कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही' असं सांगितलं. 'लवकरच सर्व संघटनांना एकत्र बोलावून मोठी पंचायत घेतली जाईल', असं देखील बंजरंग पुनिया म्हणाले. 'तसेच तीन ते चार दिवसांत योग्य निर्णय घेतला जाईल', असं देखील त्यांनी सांगितलं. 



दरम्यान, देशासाठी अनेक पदकं जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. मात्र, आता कुस्तीपटू बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम आहेत. अलीकडेच कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगेत विसर्जित करणार असल्याची घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर शेतकरी नेत्यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला.  तीन महिन्यापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे.