Beed Grampanchayat News : बीड जिल्ह्यातील तब्बल 200 ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र (caste certificate) सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. बीड जिल्हा प्रशासनाने (beed district administration) या कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,198 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. आता बीड जिल्ह्यातील सदस्यांनाही (beed grampanchayat member disqualified) दणका बसणार आहे. 


बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (beed grampanchayat news) अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागास प्रवर्गातून (OBC) निवडून आलेल्या 200 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाला जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही. त्यामुळे या सदस्यांवर अपात्र करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. 


ही निवडणूक झाल्यानंतर आरक्षित वार्डाचा निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी (beed grampanchayat member disqualified) सहा महिन्याच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र (caste certificate varification) निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक होतं. त्यानंतर मात्र एक वर्षाची मुभा वाढवून देण्यात आली होती. तरी देखील बीड जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात प्रमाणपत्र (caste certificate) निवडणूक विभागाकडे सादर केलं नाही. त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाचवेळी 1,198 ग्रामपंचायत सदस्य अपात्र 


विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 हजार 198 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सरपंच, उपसरपंचांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा पाहायला मिळत आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 617 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया 18 जानेवारी 2021 रोजी पूर्ण झाली होती. 


या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक होते. पण विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील 1 हजार 198 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे.


कोणत्या तालुक्यात किती जणांना अपात्र ठरवले 


औरंगाबाद : 118
पैठण : 469
फुलंब्री : 54
सिल्लोड : 197
सोयगाव: 36
कन्नड: 50
खुलताबाद : 20
वैजापूर : 150
गंगापूर : 104


ही बातमी वाचा: