Low Budget Trip : तापमानात रोज नव्याने वाढ होते आहे. अशातच थंड हवेच्या ठिकाणी जाणे लोक पसंत करतात. जर तुम्हालाही अशा ठिकाणी जायचे असेल तर 'हे' काही थंड हवेची ठिकाणे आहेत. जिथे गेलात तर खर्च कमी होऊ शकतो.


मसुरी 


कमी खर्चात जर तुम्ही सुट्ट्या एन्जाॅय करण्याचा विचार करत असाल तर मसुरी हे उत्तम ठिकाण आहे. मसुरी उत्तराखंडमध्ये येते.जे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. इथल्या हिरव्या दऱ्या, सुंदर पर्वत आणि इथलं थंड वातावरण तुम्हाला मोहून टाकेल. तुम्ही मित्र, कुटुंब किंवा तुमच्या जोडीदारासह येथे जाऊ शकता. तुमच्या जोडीदारासोबत भेट देण्यासाठी हे खूप रोमँटिक ठिकाण आहे. इथे फिरण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही. फक्त 6 ते 7 हजार रुपयांमध्ये तुम्ही गन हिल पॉइंट, केम्पटी फॉल, मॉल रोड सारख्या मसुरीच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.


मॅक्लोडगंज


केवळ 5 ते 6 हजारांमध्ये तुम्ही मॅक्लोडगंज ला फिरण्यासाठी जाऊ शकता. इथे थंड हवा , हिरव्या दऱ्या याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.मॅक्लॉडगंजमध्ये तुम्हाला तिबेटी रंग पाहायला मिळतील.  येथे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांचे घर आहे ज्यामुळे हे हिल स्टेशन जगभरात प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.


चेरापुंजी


उन्हाळ्यात चेरापुंजीला भेट देण्याचा उत्तम पर्याय आहे. येथे अनेक नद्या आहेत आणि सतत पाऊस पडतो. चेरापुंजी नेहमी ढगांच्या धुक्यात असते. हे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ ठिकाण असल्याचेही सांगितले जात आहे. हे हिल स्टेशन बांगलादेशच्या सीमेला जोडलेले आहे. नोहकालिकाई धबधबा हे चेरापुंजीतील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. हजारो फुटांवरून कोसळणारा हा धबधबा स्वतःच सौंदर्याने भरपूर आहे. 


अल्मोडा


तुम्ही उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सुट्ट्या देखील घालवू शकता. हे ठिकाणही खूप स्वस्त आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत सुमारे 5 ते 10 हजार रुपयांमध्ये चांगली ट्रिप प्लॅन करू शकता.राहण्या-खाण्यावर जास्त खर्च करावा लागत नाही. 


डेहराडून


उत्तराखंडची राजधानी डेहराडून हे उन्हाळ्यात भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही येथे अनेक चांगल्या ठिकाणांना भेट देऊ शकता, जसे की  डाकू की गुफा, टपकेश्वर मंदिर, सहस्त्रधारा ही येथे पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. तुम्ही इथल्या पर्वत आणि तलावांचाही आनंद घेऊ शकता, त्यामुळे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी डेहराडूनच्या मैदानापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही