World Wrestling Championships 2022: जागतिक कुस्ती स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि रवी कुमार दहिया (Ravi Dahiya) हे सर्बियाच्या बेलग्रेड येथे होणार्‍या 2022 जागतिक कुस्ती स्पर्धेत 30 सदस्यीय भारतीय कुस्ती दलाचं नेतृत्व करतील. दरम्यान, 18 सप्टेंबरपर्यंत बेलग्रेड येथे रंगणाऱ्या  ग्रीको-रोमन कुस्ती तसेच पुरुष आणि महिलांच्या फ्री स्टाईल स्पर्धांचा समावेश आहे. तीन गटांमध्ये भारतानं प्रत्येकी 10 कुस्तीपटू पाठवले आहेत. नुकतीच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी दमदार प्रदर्शन केलं होतं. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू कशी कामगिरी बजावतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


बर्मिंगहॅम येथे गेल्या महिन्यात पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत बजरंग पुनिया आणि रवि कुमार दहियानं सुवर्णपदक जिंकलं होतं. आता जागतिक कुस्ती स्पर्धेत दम दाखवण्यासाठी दोन्ही खेळाडू सज्ज झालेत. त्यांना नॅशनल सेलेक्शन ट्रायलमधून सुट देण्यात आली आहे. 


टोकियो 2020 मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या रवि कुमार दहियानं 2019 मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानं पुरूषांच्या 57 किलोग्राम वजनी गटात दुसरे मानांकन मिळालं असून त्याला अमेरिकेच्या विद्यमान विश्वविजेत्या थॉमस गिलमन याच्याशी कडवी टक्कर द्यावी लागेल. बजरंग पुनियालाही 65 किलोग्राम वजनी गटात दुसरं मानांकन मिळालं आहे. त्यानं 2018 मध्ये रौप्य, 2013 आणि 2019 मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. बजरंग पुनिया हा जागतिक चॅम्पियनशिपमधील सर्वात यशस्वी भारतीय कुस्तीपटू आहे, त्याच्या नावावर तीन पदकांची नोंद आहे.


भारतीय संघ


पुरूष फ्रीस्टाइल
रवि दहिया (57 किलोग्राम), पंकज मलिक (61 किलो), बजरंग पुनिया (65 किलोग्राम), नवीन मलिक (70 किलोग्राम), सागर जगलान (74 किलोग्राम), दीपक मिर्का (79 किलोग्राम), दीपक पूनिया (86 किलोग्राम), विक्की हुड्डा (92 किलोग्राम), विक्की चाहर (97 किलोग्राम), दिनेश धनखड़ (125 किलोग्राम)


महिला फ्रीस्टाइल
अंकुश (50 किलोग्राम), विनेश फोगट (53 किलोग्राम), सुषमा शौकीन (55 किलोग्राम), सरिता मोर (57 किलोग्राम), मानसी अहलावत (59 किलोग्राम), सोनम मलिक (62 किलोग्राम), शेफाली (65 किलोग्राम), निशा दहिया (68 किलोग्राम), रीतिका (72 किलोग्राम) और प्रियंका (76 किलोग्राम)


ग्रीको रोमन
अर्जुन हलकुर्की (55 किलोग्राम), ज्ञानेंद्र (60 किलोग्राम), नीरज (63 किलोग्राम), आशु (67 किलोग्राम), विकास (72 किलोग्राम), सचिन (77 किलोग्राम), हरप्रीत सिंह (82 किलोग्राम), सुनील कुमार (87 किलोग्राम), दीपांशु (97 किलोग्राम), सतीश ( 130 किलोग्राम)


हे देखील वाचा-