Road Safety World Series 2022 Time Table:  रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला आजपासून (10 सप्टेंबर) सुरूवात होत आहे. जगभरात रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळवली जाते. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभाग घेतात. यंदाच्या हंगामात 8 संघ सहभागी होतील. यंदाही इंडियााचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) इंडिया लीजेंड्स संघाचं (India Legends) नेतृत्व करताना दिसणार आहे. माजी क्रिकेटपटूंच्या असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सचिननं आता सरावाला सुरुवातही केली असून, त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्सचा सामना आज जॉन्टी रोड्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका लीजेंड्सशी होणार आहे. त्यानंतर इंडिया लिजेंड्स 14 सप्टेंबर 2022 रोजी वेस्ट इंडिज लीजेंड्स विरुद्ध त्यांचा दुसरा सामना खेळेल. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा दुसरा हंगाम 10 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत खेळला जाणार आहे. या हंगामातील सर्व सामने कानपूर, रायपूर, इंदूर आणि डेहराडून येथे खेळली जाणार आहेत.

रोड सेफ्टी सिरिजचं संपूर्ण वेळापत्रक:

तारीखसामनाठिकाणवेळ
10 सप्टेंबर

इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स

ग्रीन पार्क, कानपूर7:30 PM
11 सप्टेंबर

बांग्लादेश लीजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडीज लीजेंड्स

ग्रीन पार्क, कानपूर3:30 PM
11 सप्टेंबर

ऑस्ट्रेलिया लीजेंड्स विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स

ग्रीन पार्क, कानपूर7:30 PM
12 सप्टेंबरन्यूझीलंड लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्सग्रीन पार्क, कानपूर7:30 PM
13 सप्टेंबर

इंग्लंड लीजेंड्स विरुद्ध  श्रीलंका लीजेंड्स

ग्रीन पार्क, कानपूर7:30 PM
14 सप्टेंबर

इंडिया लीजेंड्स विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स

ग्रीन पार्क, कानपूर7:30 PM
15 सप्टेंबर

बांग्लादेश लीजेंड्स विरुद्ध न्यूझीलंड लीजेंड्स 

ग्रीन पार्क, कानपूर7:30 PM
17 सप्टेंबरइंग्लंड लीजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडीज लीजेंड्सहोळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर3:30 PM
17 सप्टेंबरदक्षिण आफ्रिका लीजेंड्स विरुद्ध श्रीलंका लीजेंड्सहोळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर7:30 PM
18 सप्टेंबरऑस्ट्रेलिया लीजेंड्स विरुद्ध बांग्लादेश लीजेंड्सहोळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर3:30 PM
18 सप्टेंबरइंडिया लीजेंड्स विरुद्ध न्यूझीलंड लीजेंड्सहोळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर7:30 PM
19 सप्टेंबरइंग्लंड लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्सहोळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर7:30 PM
21 सप्टेंबरइंडिया लीजेंड्स विरुद्ध बांग्लादेश लीजेंड्सराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून7:30 PM
22 सप्टेंबरवेस्ट इंडीज लीजेंड्स विरुद्ध न्यूझीलंड लीजेंड्सराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून7:30 PM
23 सप्टेंबरऑस्ट्रेलिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्सराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून7:30 PM
24 सप्टेंबरइंडिया लीजेंड्स विरुद्ध इंग्लंड लीजेंड्सराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून7:30 PM
25 सप्टेंबरश्रीलंका लीजेंड्स विरुद्ध न्यूझीलंड लीजेंड्सराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून3:30 PM
25 सप्टेंबरऑस्ट्रेलिया लीजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडीज लीजेंड्सराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून7:30 PM
27 सप्टेंबरश्रीलंका लीजेंड्स विरुद्ध बांग्लादेश लीजेंड्सशहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर3:30 PM
27 सप्टेंबरइंग्लंड लीजेंड्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया लीजेंड्सशहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर7:30 PM
28 सप्टेंबरसेमीफायनल 1शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर7:30 PM
29 सप्टेंबरसेमीफायनल 2शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर7:30 PM
1 ऑक्टोबरफायनलशहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर7:30 PM

हे देखील वाचा-