T20 World Cup 2022: एडिलेड (Adelaide) येथे झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात नेदरलँड्सच्या संघानं (Zimbabwe vs Netherlands) 30 धावांनी विजय मिळवला आहे. नेदरलँड्सच्या संघाचा सुपर 12 फेरीतील पहिलाच विजय आहे. या विजयासह आधीच स्पर्धेबाहेर झालेल्या नेदरलँड्सनं झिम्बाब्वेच्या संघाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवलाय. दरम्यान, सुपर-12 फेरीतील ब ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचं तिकट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांची सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता अधिक आहे.
या सामन्यात नेदरलँड्सच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नेदरलँड्सच्या संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेच्या संघानं गुडघे टेकले. झिम्बाब्वेला निर्धारित 19.2 षटकात 117 धावांवर ऑलआऊट झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजानं सर्वाधिक 40 धावा केल्या. तर, सीन विलियम्सनं 28 धावांचं योगदान दिलं. या दोघांशिवाय झिम्बाब्वेच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठू शकला नाही. नेदरलंड्सनं पॉल व्हॅन मेकर्ननं तीन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी पाकिस्तानविरुद्ध दुखापतग्रस्त झालेल्या बस डी लीडेनंही चांगली गोलंदाजी केली. त्यानं चार षटकांत 14 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.
झिम्बाब्वेच्या संघानं दिलेलं लक्ष्य नेदरलँड्सच्या संघानं आठराव्या षटकातच पूर्ण केलं. नेदरलँड्सनं हा सामना पाच विकेट्सनं जिंकला. नेदरलँड्सकडून मॅक्स ओडाउडनं 47 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तर, टॉम कूपरनं 32 धावांचं योगदान दिलं. याशिवाय, बास डी लीडेनं 12 चेंडूत नाबाद 12 धावांची खेळी केली. टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील नेदरलँड्सच्या संघाला पहिला विजय आहे. या सामन्यात अर्धशतकीय खेळी करणाऱ्या मॅक्स ओडाउड सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.
झिम्बाब्वेचा संघ:
वेस्ली मधेवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (विकेटकिपर), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी बेंचब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकाड्झा, टोनी मसाकादवे, टोनी मूनयोन्गा, क्लिव मडाने.
नेदरलँड्सचा संघ:
स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओडॉड, टॉम कूपर, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकिपर), रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे, लोगन व्हॅन बीक, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकेरेन, ब्रँडन ग्लोव्हरबेंच टिम प्रिंगल, तेजा निदामनुरु, शरीझ अहमद, टिम व्हॅन डर गुगटेन.
हे देखील वाचा-