KL Rahul in T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताचा सलामीवीर केएल राहुल सलग तीन सामन्यात फारत कमी धावा करुन बाद झाला होता. त्यामुळं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण आज बांग्लादेशविरुद्ध त्यानं दमदार असं अर्धशतक ठोकत टीकाकारांची तोंडं बंद केली. अवघ्या 31 चेंडूत त्यानं 50 धावा ठोकल्या. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला असला तरी भारताला एक मजबूत सुरुवात त्यानं नक्कीच करुन दिली.






केएल राहुल टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये फ्लॉप ठरत होता. स्पर्धेत त्याने सुरुवातीचे 3 सामने खेळले असताना तो या साऱ्यात मिळून केवळ 22 धावाच करु शकला.  सलामीवीर म्हणून येऊनही त्याने इतक्या कमी धावा केल्यामुळे त्याच्यावर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याला 8 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या होत्या. यानंतर, नेदरलँडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने 12 चेंडूत केवळ 9 धावाच केल्या. आजही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट शांतच राहिली. या सामन्यात तो 14 चेंडूत अवघ्या 9 धावा करून तंबूत परतला. राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघाची चिंता वाढवत असताना आज मात्र बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरुन त्यानं अर्धशतक ठोकलं. सुरुवातीला काहीसा संथगतीने तो खेळत होता. पण काही चौकार आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत केएल राहुलनं 50 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आता या स्पर्धेत होणाऱ्या उर्वरित सामन्यांमध्ये राहुलच्या कामगिरीकडे सर्वाचेच लक्ष असेल.


केएल राहुलची टी20 कारकिर्द


केएल राहुल भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे त्यामुळे तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. दरम्यान त्याच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 70 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 66 डावांमध्ये राहुलने 38.09 च्या सरासरीने आणि 139.11 च्या स्ट्राईक रेटने एकूण 2209 धावा केल्या आहेत. त्याचवेळी 110* धावा हा त्याचा उच्चांक ठरला आहे.


हे देखील वाचा-


IND vs BAN, Toss Update : नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारतीय फलंदाज मैदानात