T20 World Cup 2022: मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) पाकिस्तानविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतानं (India vs Pakistan) चार विकेट्स राखून विजय मिळवला. भारताच्या विजयात विराट कोहलीचं (Virat Kohli) मोलाचं योगदान आहे. भारतीय संघ अडचणीत असताना विराट कोहलीनं 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला निसटता विजय मिळवून दिला. या रोमहर्षक विजयानंतर सर्व खेळाडू भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या सामन्यात महत्वाची खेळी करणाऱ्या हार्दिक पाड्यानं (Hardik Pandya) भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहलीची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात भारत-पाकिस्तान सामन्यातील थरार आणि विजयाची कहाणीबद्दल बोललं जातंय. 


मेलबर्न क्रिकेट मैदानावर 90 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विराट कोहलीनं मॅचविनिंग इनिंग खेळली. या विजयानंतर भारताचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्यानं विराट कोहलीची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत विराटनं या सामन्याची परिस्थिती आणि भारतानं हा सामना कसा जिंकला? याबद्दल सविस्तर चर्चा केलीय. तसेच या सामन्यात त्यानं हार्दिकसोबत केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीबद्दलही बोललं आहे.


व्हिडिओ-



 


सुनिल गावस्कर मैदानातच नाचायला लागले
भारताचा हा विजय साजरा करण्यासाठी भारताचे काही माजी दिग्गज क्रिकेटपटू मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित होते. इरफान पठाण, सुनील गावस्कर आणि श्रीकांत यांसारख्या दिग्गजांनी मोठ्या उत्साहात भारताचा विजय साजरा केला. हे सर्व लोक टूर्नामेंटमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेले आहेत.


भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव
भारताच्या या विजयानंतर सर्व दिग्गजांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात चॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचा भाग असलेल्या बहुतेक खेळाडूंनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युवराज सिंह, रॉबिन उथप्पा आणि हरभजन सिंह या दिग्गजांनी सोशल मीडियावर भारताचा विजय जल्लोषात साजरा केला.