IND vs PAK, T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतानं त्यांच्या पहिल्याच सामन्यात कट्ट्रर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रोमांचक आणि संस्मरणीय विजय नोंदवला. दोन्ही संघात रविवारी झालेल्या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज पाहायला मिळाली. अंगावर काटा आणणाऱ्या या सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) महत्त्वाची भूमिका बजावत सामन्याच्या निकाल भारताच्या बाजूनं लावला. त्याला हार्दिक पांड्याचीही (Hardik Pandya) चांगली साथ मिळाली. यापूर्वी पाकिस्तानी संघ भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर हतबल दिसत होता. अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज संघर्ष करताना दिसले.


या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्मानं पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पाकिस्तानच्या डावातील दुसऱ्याच षटकात अर्शदीपनं बाबर आझमच्या रुपात पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर आक्रमक फलंदाज मोहम्मद रिझवानलाही स्वस्तात माघारी धाडलं. पहिल्या 10 षटकात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजाचे हात बांधून ठेवले. मात्र, यानंतर इफ्तिखार अहमदनं मोठे फटके खेळायला सुरुवात केली.  त्यानं 34 चेंडूत 51 धावा केल्या. त्याचवेळी शान मसूदनं 42 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय पाकिस्तानचा अन्य कोणताही फलंदाज मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही. पाकिस्ताननं 20 षटकांत आठ विकेट्स गमावून 159 धावा केल्या. अर्शदीप आणि हार्दिकनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.


व्हिडिओ-




 


विराट कोहलीची संस्मरणीय खेळी
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. भारतीय संघानं अवघ्या 31 धावांत चार विकेट गमावल्या. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी समंजस खेळी करत संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 82 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली.


भारताची विजयी सुरुवात
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अनेक चढ उतार पाहायला मिळाले. कधी सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकताना दिसला. तर, कधी सामन्यात भारताचं पारडं जड दिसत होतं. पण अखेरच्या तीन षटकात विराट कोहली आणि हार्दिक पाड्यानं आक्रमक खेळी करत भारताला विजय मिळून दिला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, एकट्या विराट कोहलीनं भारताची बुडती नाव वाचवली. यासह भारतानं टी-20 विश्वचषकातील सुरुवात विजयानं केली.


हे देखील वाचा-